Home देश/विदेश प्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर!

प्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर!

प्रेमासाठी वाट्टेल ते..! 

उस्मानाबाद: ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ असं म्हणतात ते उगाच नाही, तर प्रत्यक्षातही अनेक जण आहेत जे प्रेमासाठी काही पण करायला तयार होतात. उस्मानाबाद येथील एक युवक लॉक डाऊन च्या काळात प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क दुचाकीने पाकिस्तानला निघाला होता मात्र त्याला सीमेवरच अटक करण्यात आली आहे.या प्रकाराची चर्चा चांगली रंगत असून नेमके काय आहे हे प्रकरण हे आपण जाणून घेऊया

सीमा सुरक्षा दलाने भारत-पाक सीमेवरुन एका 20 वर्षीच्या मुलाला १७ जुलै रोजी ताब्यात घेतले आहे. हा मुलगा उस्मानाबादचा असून प्रेयसीला भेटण्यास पाकिस्तानला जात असल्याचे सांगत आहे. झिशान सिध्दिकी असं या तरुणाचं नाव आहे.

त्याचे वडील मौलाना आहेत. त्यांनी सांगितले की, झिशान मोबाईलचा चार्जर आणायचा आहे, म्हणून तो घराबाहेर पडला. मात्र दिवसभर तो घरी परत आलाच नाही. मुलाची काळजी वाटू लागल्याने आम्ही पोलिस तक्रार केली.
दरम्यान तो सिमेवर पकडला गेला अशी माहिती समोर आली।. झिशान सिद्दिकीला आता गुजरात पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात कलम 3 आणि भादंवि 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चौकशी अंती झिशानला उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर कथित पाकिस्तानी मुलीशी ओळख झाल्यावर तो तिच्या प्रेमात पडला आणि नंतर आपल्या स्वप्नातील शहजादीला भेटण्यासाठी चक्क बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानमध्ये जाण्याच्या तयारीत होता. अगदी चित्रपटात शोभावी अशी ही कथा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here