Home Breaking News धक्कादायक! या जिल्ह्यात कोरोना बळीचे ‘शतक’

धक्कादायक! या जिल्ह्यात कोरोना बळीचे ‘शतक’

I

अकोला : शनिवाारी दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 229 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 221 अहवाल निगेटीव्ह तर आठ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2065 (1967+98) झाली आहे. आज दिवसभरात 15 रुग्ण बरे झाले, असून आता 282 जणांवर उपचार सुरु आहेत, दरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळीची संख्या शंभरी पार गेली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 16327 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 15849, फेरतपासणीचे 161 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 317 नमुने होते. आजपर्यंत एकूण 16282 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 14315 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2065 (1967+98) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आज आठ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात आठ जणांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चारही पुरुष आहेत. त्यातील तीन जण बोरगाव मंजू येथील तर अन्य एक जण अकोली जहागिर ता. अकोट येथील रहिवासी आहेत. आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष असून ते सर्व मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. काल रात्री(दि.17) रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट्मध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट्मध्ये पॉझिटीव्ह आलेल्या अहवालांची संख्या आतापर्यंत 98 झाली आहे.त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.

15 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर कोविड केअर सेंटर मधून 10, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन व हॉटेल रिजेन्सी मधून दोन अशा एकूण 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू
दरम्यान आज दोन जणांचा मृत्यू झाला. हे दोघे पुरुष असून त्यातील एक 76 वर्षीय तर अन्य 54 वर्षीय आहे. हे दोघे जण अकोट येथील रहिवासी आहेत. ते दि.10 रोजी दाखल झाले होते. त्यांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

282 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूणपॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2065 (1967+98) आहे. त्यातील 101 जण (एक आत्महत्या व 100 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 1682 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 282 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here