Home शैक्षणिक लक्ष्मीनारायण इंटर. ज्युनिअर कॉलेजची १००% निकालाची परंपरा कायम

लक्ष्मीनारायण इंटर. ज्युनिअर कॉलेजची १००% निकालाची परंपरा कायम

द रिपब्लिक न्युज नेटवर्क
खामगाव :- लक्ष्मीनारायण इंटर. ज्युनिअर कॉलेजमध्ये १७ जुलै रोजी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. १६ जुलै रोजी लागलेल्या महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभाग मंडळाच्या १२ वी निकालामध्ये पास झालेल्या तसेच गुणवंत विद्याथ्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. कॉलेज नी खामगाव शहरात प्रथम क्रमांकावर येऊन आपली १००% निकालाची परंपरा कायम ठेवली.
कॉलेजमधून विज्ञान शाखेतून कु. अंजली विजय पवार हिने ६५० पैकी ५५७ मार्क ८८.७६% नी प्रथम क्रमांकावर , कु. संजना खूबचंद छटवाणी ५६३ मार्क ८६.६१% कमवीत द्वितीय क्रमांक व कु. रिद्धी संतोष परसेवार हिला ५६१ मार्क ८६.३०% मिळवून तृतीय क्रमांक आला.
वाणिज्य शाखेतून कु. अंजली जयप्रकाश लखानी हिने ६५० पैकी ५९५ मार्क ९१.५३% मिळवीत कॉलेजमधून प्रथम क्रमांक , कु. कशिश मनोज लखानी ५८४ मार्क ८९.८४ %नी द्वितीय क्रमांक , तृतीय क्रमांक हा कु. स्वाती कमलकिशोर पालीवाल ५७८ मार्क ८८.९२% ने हिने पटकावला.
कला शाखेतून कु. वैष्णवी गणेश जाधव ह्या विद्यार्थिनीने ६५० पैकी ४५९ मार्क मिळवीत ७०.६१% नी कॉलेज मधून प्रथम क्रमांक पटकावला. तर कु. शुभांगी अनिल गवई ४४१ मार्क ६७.८४% नी द्वितीय क्रमांक व कनिष्क संतोष भिडे ह्याने ४०२ मार्क कमवीत ६१.८४% मिळवून कॉलेज मधून तृतीय क्रमांक मिळविला. सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे कॉलेज चे अध्यक्ष तेजेंद्रसिंग चौहान आणि संचालिका सौ. राजकुमारी चौहान यांनी अभिनंदन व सत्कार करून पुढील यशस्वी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य राहुल अग्रवाल व सर्व प्राध्यापकवृन्दानी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here