Home शैक्षणिक वैष्णवी बोबडे हिचे सुयश

वैष्णवी बोबडे हिचे सुयश

द रिपब्लिक न्युज नेटवर्क
बुटीबोरी नागपुर येथील बालाजी ज्युनिअर कॉलेज 12 वी कॉमर्सची विद्यार्थीनी वैष्णवी भास्कर बोबडे हिने ८५.६९ गुण संपादित करुन सदर विद्यालयातुन व्दितीय क्रमांक पटकावुन घवघवीत यश संपादन केले. कॉमर्स सह सर्व शाखेचा निकाल लागला आहे. माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने गुरवारी बारावीचा निकाल जाहीर केला. कॉमर्स विभागातुन वैष्णवी भास्कर बोबडे या विद्यार्थीनीला ८५ .६९% गुण मिळवुन ती महाविद्यालयात व्दितीय आली आहे. वैष्णवी बोबडे हिने आपल्या यशाचे श्रेय बुटीबोरी बालाजी ज्युनिअर कॉलेजचे मार्गदर्शक प्राध्यापक प्रविन भोयर, मनमोहन रामटेके, सचिन खंते ,प्रिती मोरे , आई वडिल यांना दिले. वैष्णवी भास्कर बोबडे हिच्या वर सर्व स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. यशस्वी विद्यार्थीचे बुटीबोरी बालाजी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापक वृंदानी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थांना भावी वाटचालीसाठी व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here