Home शैक्षणिक अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून वाद, मात्र विद्यार्थी संभ्रमात

अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून वाद, मात्र विद्यार्थी संभ्रमात

सागर कुटे/ अकोला

कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याने प्रथम व व्दितीय वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून राज्य व केंद्र सरकारमध्ये वाद सुरू झाला आहे. परंतु या वादात विद्यार्थी संभ्रमात सापडले आहे.
कोरोना व्हायरसमुळे मार्च ते मे महिन्यात होणाऱ्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांचे वेळपत्रक कोलमडून गेले आहे. आता अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता त्या विद्यार्थ्यांना इतर वर्षाच्या गुणांवरून सरासरी काढून उत्तीर्ण करावे, असा आग्रह
राज्य सरकार व विद्यार्थ्यांचा आहे. मात्र, परीक्षा न घेता पदवी दिल्यास त्यास काही अर्थ राहणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने व यूजीसीने घेतली आहे. त्यामुळे सध्या राज्य व केंद्र सरकार असा वाद निर्माण झाला आहे.

 • परिस्थितीवर लक्ष देऊन रहा, मुक्त विद्यापीठाचा सल्ला
  इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही रखडल्या आहे. वरिष्ठश्रेणी पद मिळविण्यासाठी अथवा पूर्णवेळ शिक्षणाला न देऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा यामध्ये भरणा आहे. याही विद्यार्थ्यांच्या अंतिम
  वर्षाच्या परीक्षा कधी होतील यावर विद्यापीठ केंद्राकडून संकेतस्थळावर व होणाऱ्या निर्णयावर लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

 • विद्यार्थी परीक्षेला येतील का? याचा व्हावा विचार
  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्येचा आलेख वाढत आहे. राज्यात दररोज अडीच हजारांपेक्षा अधिक रुग्णांची भर पडत आहे. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र
  आहे. दुसरीकडे अनेक महाविद्यालयांच्या इमारती, हॉस्टेल कोविड-19 साठी गुंतल्या आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा घेण्याचा विद्यार्थी केंद्रीत निर्णय घेण्यापूर्वी किती विद्यार्थी परीक्षेसाठी हजर राहतील अथवा किती विद्यार्थ्यांना पालक
  परीक्षेसाठी पाठवतील, याचाही विचार करावा, असे शिक्षण तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here