Home राजकारण जे पालक मंत्री डॉक्टर शिंगणे यांना नाही जमलं ते आमदार फुंडकर...

जे पालक मंत्री डॉक्टर शिंगणे यांना नाही जमलं ते आमदार फुंडकर यांनी करून दाखवलं

वाचा ‘या’ जिल्ह्यात असं घडलं तरी काय?

द रिपब्लिक न्युज नेटवर्क
खामगाव – कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात खामगाव मध्ये तपासणी लॅब असावी यासाठी स्थानिक आमदार आकाश फुंडकर यांनी पुढकार घेतला. लोक सहभागसाठी प्रयत्न केले, त्यासाठी शहरातील दानशूर व्यक्ती विपीन गांधी यांनी २५ लाख रुपये मदत केली, तसेच अमोल ठाकरे यांनी सहकार्य केले. या प्रयत्नांना अखेर यश आले असून राज्यातील लोकसहभागातून पहिली कोरोना टेस्टिंग लॅब खामगाव मध्ये निर्माण झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यासह खामगाव शहरात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून कोवीड रूग्णांच्या स्वँब तपासणीसाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने रूग्ण शोधण्यास विलंब होत आहे. मात्र आता जिल्ह्यातील खामगाव येथे कोरोना स्वँब टेस्ट लँब दोन सुरू होणार असून येथे दररोज ५० रूग्णांचे स्वँब तपासणी केली जाणार आहे. खामगावातील उद्योजक विपिन गांधी यांच्या पुढाकारातून ही लँब पुर्णत्वास गेली आहे, अशी माहिती खामगाव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी दिली.
यावेळी आ.आकाश फुंंडकर यांनी जिल्ह्यात कोरोना स्वँब टेस्ट लँब ला विलंब होत असल्याने जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून कोरोना स्वँब टेस्ट लँब साठी निधी मंजूर असतानाही जिल्हा प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेतली नाही. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही कोरोना स्वँब टेस्ट लँब सुरू झाली नाही. याबाबत पाठपुरावा केला असतानाही फारसे यश आले नाही. तर दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना जिल्ह्यातील कोवीड सेंटरमध्ये रूग्णांना पाहीजे त्या सुविधा मिळत नाहीत अशा तक्रारी समोर येत आहेत. कोरोना बाधित रूग्णांची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी जिल्हाधिकारी फारशा उत्सुक नाहीत असा आरोपही आ. फुंडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यावर केला. अशा परिस्थितीत खामगाव येथील उद्योजक विपिन गांधी यांनी स्वता २५ लाख रूपए खर्च करून स्थानिक सामान्य रूग्णालयात सर्व सुविधा युक्त कोरोना स्वँब टेस्ट लँब उभारणीसाठी मदत केली. यासाठी दिशा संस्थेचे संचालक स्वप्निल गावंडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वानखडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे व आरोग्य विभागाच्या अधिकारी , कर्मचारी यांचे लँब उभारणीसाठी महत्वाचे योगदान लाभले. येत्या काही दिवसात ही लँब कार्यान्वित होणार आहे. तसेच आमदार निधीतून कोरोना स्वँब टेस्ट लँब करिता निधी मंजूर असून लवकरच तिही मशिन आल्यावर या लँबची क्षमता वाढणार आहे असेही आमदार आकाश फुंडकर म्हणाले.

 * पालकमंत्र्यांना नाही जमलं ते फुंडकरांनी केलं

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅबसाठी निधी देवून लॅब लवकर सुरू करु असे राज्याचे अन्न व औषध विभागाचे मंत्री व बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जाहीर केले, या घोषणेनंतर अजूनही जिल्ह्यात तपासणी लॅब सुरू झाली नाही. आमदार आकाश फुंडकर यांनी मात्र लोक सहभागातील राज्यातील पाहिली लॅब खामगाव मध्ये सुरू केली. त्यासाठी राज्य , केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. जे जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री यांना जमलं नाही ते आमदार आकाश फुंडकर यांनी करून दाखविले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आणखी एक मशीन खरेदीसाठी 20  लक्ष रुपये निधी दिला असून ही मशीन आल्यावर कोरोना रुग्ण नमुने तपासणीची क्षमता दुपटीने वाढणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here