Home Breaking News आज जिल्ह्यात 64 पॉझिटिव्ह रुग्ण

आज जिल्ह्यात 64 पॉझिटिव्ह रुग्ण

द रिपब्लिक न्युज नेटवर्क
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 366 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 302 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 64 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 13 व रॅपिड टेस्टमधील 51 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 29 तर रॅपिड टेस्टमधील 273 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 302 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह अहवालामध्ये आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : वडगांव माळी ता. मेहकर – 35, 54, 30, 71, 29, 35 व 55 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरूष. डोणगांव ता. मेहकर : 52 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी व 28 वर्षीय पुरूष. डोंगरखंडाळा ता. बुलडाणा : 33 वर्षीय पुरूष, मुठ्ठे ले आऊट बुलडाणा : 55 वर्षीय महिला. खामगांव : रेखा प्लॉट 30 व 45 वर्षीय पुरूष, 8 वर्षीय मुलगा, 38 वर्षीय महिला, जुना फैल 56 व 40 वर्षीय महिला, नवा फैलमधील 63, 17, 55 वर्षीय महिला, 75, 80 व 74 वर्षीय पुरूष. कोठारी प्लॉट 27 व 81 वर्षीय पुरूष, बाळापूर फैल 20, 19, 30, 25 व 27 वर्षीय पुरूष, शिवाजी नगर 46 व 42 वर्षीय महिला, जलालपूरा 52 वर्षीय महिला, शेगांव : 80 वर्षीय पुरूष, 74 वर्षीय महिला, पुरूष, एसबीआय कॉलनी 26 वर्षीय महिला, लोहारा ता. शेगांव 28 वर्षीय पुरूष, उमेश नगर 24 वर्षीय महिला, रॉक नगर 27 वर्षीय पुरूष, चारमोरी 40 वर्षीय पुरूष. मलकापूर : लख्खानी चौक 17, 39 वर्षीय पुरूष, 39 व 20 वर्षीय महिला. चिखली : आनंद नगर 32 व 30 वर्षीय पुरूष, दे. राजा : अहिंसा मार्ग 51, 52, 28, 25, 22 व 75 वर्षीय पुरूष. जळगांव जामोद : 70 वर्षीय दोन, 65, 51, 40 वर्षीय पुरूष, 13, 51, 36 व 45 वर्षीय महिला संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 64 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 4 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये टिळक मैदान खामगांव येथील 45 वर्षीय पुरूष, खामगांव येथील 21 वर्षीय महिला, मलकापूर येथील 40 वर्षीय पुरूष व बारादरी मलकापूर येथील 32 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 5028 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 272 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 272 आहे.
आज रोजी 42 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 5028 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 556 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 272 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 267 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 17 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here