Home Breaking News शेगाव-खामगाव रोडवर अपघात : एक जण ठार ; मृतदेह छिन्नविछिन्न

शेगाव-खामगाव रोडवर अपघात : एक जण ठार ; मृतदेह छिन्नविछिन्न

द रिपब्‍लिक न्‍युज नेटवर्क
शेगाव ः शेगाव- खामगाव रोडवर मंगळवारी सायंकाळी मोटारसायकल आणि टिप्परमध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघात एव्हडा भीषण होता कि,यामध्ये मृतदेह छिन्नविछिन्न झाला आहे.
याबाबत प्राप्‍त माहितीनुसार टाकळी हाट येथील रहिवासी रघुनाथ जगन्नाथ रावबकार वय 35 हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एमएच २८ क्यू ८०१९ ने सायंकाळी घरी घरी जात असताना शेगाव- खामगाव रोडवरील चिंचोली फाट्या जवळ समोरून येणाऱ्या एमएच २८-एबी८२७ या टिप्पर ने जबर धडक दिली. एवढेच नव्‍हे तर टिप्पर चालकाने मोटारसायकलवरून आपले वाहन नेल्याने मोटरसायकलस्वार जगन्नाथ रावबकार हे जागीच ठार झाले.घटनेची माहिती शेगाव शहर पोलिसांना मिळळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक आणि मृतदेह ताब्यात घेतले. ट्रक चालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here