उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
द रिपब्लिक न्युज नेटवर्क
पातुर्डा ः संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा हे गाव जास्त लाेकसंख्येचे गाव असून गावात मागील महिन्यातील 9 जून ला कोरोनाचा शिरकाव होऊन पहिला पेशंट मिळाला होता. त्यामुळे येथे पहिला कंटेंन्मेंट झोन तयार करण्यात आला. त्यानंतर दिवसेंदविस रुग्णसंख्या वाढत गेली. त्यामुळे खरीबदारी म्हणून गावातील डॉक्टरांनी दवाखाने काही दिवस बंद केले होते. त्यामुळे रुग्णांना बाहेरगावी दवाखान्यात जावे लागत होते आणि सध्या कोरोनाची महामारी असल्यामुळे कोणत्याही दवाखाण्यात बाहेर गावातील अनोळखी व्यक्तीला डॉ. पाहिजे तसे चेक अप करत नव्हेत. यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. अशातच सध्या पाणी पावसाचे दिवस आहे. रात्री बे रात्री शेतकरी ,मजूर हा शेतात जातो. अशात गावात जर डॉक्टर असूनही ट्रीटमेंट मिळाली नाही तर त्याच्या जीवाचे बरे वाईट होऊ शकते म्हणून या सर्व बाबिचा विचार करून येथील पं. स. सदस्य सौ. रत्नप्रभा ताई धर्माळ व माजी प.स. सदस्य लोकेश राठी यांनी आज 13 जुलै रोजी कंटेंमेंट झोनमधील दवाखाने सुरु करण्याचे निवेदन दिले.