द रिपब्लिक न्युज नेटवर्क
शेगाव ः बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोविंद मिरगे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये बाजार समितीचा अनाठाई खर्च केलेला असून अनेक व्यवहारांमध्ये शासनाची परवानगी न घेता अधिकारात गैरउपयोग करून निर्णय घेतल्याने बाजार समितीचे नुकसान व अनियमितेचा ठपका ठेवून त्यांचे बाजार समितीमधील सदस्य आणि सभापतिपद अपात्र ठरविले असल्याचा निकाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांनी सोमवारी दिला आहे. या आदेशामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या भारतीय जनता पार्टी प्रणित परिवर्तन गटाचे वर्चस्व आहे. मात्र सभापती गोविंद मिरगे यांनी आपल्या कार्यकाळातमध्ये अनेक चुकीचे निर्णय घेतल्याने बाजार समितीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, याशिवाय बाजार समितीचे सचिव व व्यापार्यांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती नियम 2017 चे 10 नुसार नुकसान केल्याच्या तक्रारी जिल्हा निबंधक यांच्याकडे मागील दोन वर्षापासून करण्यात आलेल्या होत्या. यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जिल्हा उपनिबंधक डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी सोमवारी महाराष्ट्र शासन, सहकार व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई अधिसुचना दि.१२ फेब्रुवारी, २०२० मधील तरतुदीनुसार.सभापती गोविंद मिरगे यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, शेगांव चे सभापती यांनी वमहाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीच्या निवडणुका) नियम २०१७ चे नियम १० (१) (फ), नियम १० (१) (आय) व नियम १० (३) नुसार अपात्र ठरवून समिती च्या सदस्य पदावरुन कमी करण्याचे आदेश बहाल केले. या आदेशामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.