Home राजकारण “हो, भाजपानं मला ऑफर दिली; हवे तितके पैसे घ्या, पण…”; काँग्रेस आमदाराचा...

“हो, भाजपानं मला ऑफर दिली; हवे तितके पैसे घ्या, पण…”; काँग्रेस आमदाराचा दावा

 द रिपब्लिक न्युज नेटवर्क

भाजपाकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या आरोपानंतर राजस्थानमध्ये राजकीय भूकंपाचे धक्के जाणवू लागले. आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणात उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पोलिसांनी नोटीस पाठवली व त्यामुळे नाराज झालेल्या पायलट यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. भाजपाकडून घोडेबाजार होत असल्याचा आरोप होत असताना एका काँग्रेसनं आमदारानं भाजपाकडून ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट केला आहे. एनडीटीव्ही इंडियानं हे वृत्त दिलं आहे.

राजस्थानात रविवापासून राजकीय घटनांना प्रचंड वेग आला आहे. नाराज झालेल्या सचिन पायलट यांनी दिल्ली गाठली. त्यामुळे तीन महिन्यापूर्वी मध्य प्रदेशात कमलनाथ यांचं सरकार अशाच पद्धतीनं कोसळलं होतं. तसं काही राजस्थानात होत की काय? यावरून बरेच तर्कविर्तक सुरू आहेत. दरम्यान, राजस्थान काँग्रेसनं व्हिप काढत पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित असलेल्या एका काँग्रेस आमदारांनं भाजपाकडून ऑफर देण्यात आल्याचा दावा केला.

काँग्रेसचे आमदार राजेंद्र गुडा यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपानं त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी भाजपाकडून किती पैसे देण्याची ऑफर दिली होती, याविषयी माहिती दिली नाही. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भाजपाकडून बँकेंची चावी गुडा यांना देण्यात आली होती. तसेच हवे तितके पैसे घ्या पण भाजपात या, अशी ऑफर देण्यात आली होती. काँग्रेसचे आमदार पक्षात यावेत म्हणून भाजपाकडून पूर्ण प्रयत्न केले जात असल्याचा दावाही गुडा यांनी केला आहे. गुडा हे बसपातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत.

सचिन पायलट यांनी बंडांची भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसनं व्हिप काढला होता. तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या घरी बैठक बोलावली होती. या बैठकीला राजेंद्र गुडा हे उपस्थित होते. बैठकीसाठी आल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, दुसरीकडे सचिन पायलट यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसकडून त्यांना बंड मागे घेण्याचं आवाहन केलं जात असून, स्वतः राहुल गांधी व प्रियंका गांधीही पायलट यांच्याशी चर्चा करत असल्याचं वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here