Home कृषी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्याना प्रतिक्षा 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्याना प्रतिक्षा 

विजय हागे : द रिपब्लिक न्युज नेटवर्क
टूनकी : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची ८० टक्के जनता शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. सतत चार – पाच वर्षापासुन शेतकऱ्याना दुष्काळाचा सामणा करावा लागत असल्यामुळे शेतकरी शेती व्यवसायापासुन निरुत्साही झाला होता . शेतीसाठी महागडे बियाणे, रासांयनिक खते आणि मशागतीचा खर्च याची सुद्धा खर्च करण्याची शेतकऱ्याची परिस्थिती आज रोजी नाही. या परिस्थीतीचा विचार करुण शेतकऱ्याचा उत्साह वाढविण्याकरिता शासणाने शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रूपयेप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला घेण्यात आला होता.
या योजणेच्या अमलबजावनी नंतर शेतकऱ्याच्या उत्पन्न दुप्पटीन वाढ होणार असल्याचे शासणाकडुन सांगण्यात आले होते. यामधे पात्र लाभार्थी म्हणुन शेतकऱ्याच्या नावाने 7/12 असने आवश्यक आहे . राज्यात 18 डिसेंबर 2018 पासुन या योजनेची अमलबजावनी गृहीत धरण्यात आली. या योजनेचा लाभ दरवर्षी शेतकऱ्याना दोन हजार रुपये प्रमाणे तिन टप्यात मिळणार असल्याचे सांगण्यात आले .फेब्रवारी 2019 मध्ये युध्दपातळीवर प्रत्येक तहसिल कार्यालयावर शेतकऱ्या जवळुन कागदपत्रे घेवुन  जुळवाजुळव करूण यादया तयार करण्यात आल्या. सन 2019 मधे बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यात दोन, तिन टप्पे टाकण्यात आले. मात्र सन 2020 या वर्षीच्या हंगामात बऱ्याचश्या शेतकऱ्याचा खात्यात निधीचा एकही टप्पा न टाकल्याने तालुकयातील शेतकरी मदतीची प्रतिक्षा करीत आहेत. आधिच शेतकऱ्यावर अपुरा पाऊस, बोगस बियाण्याअभावी दुबारा पेरणीचे संकट निर्माण झाले. मशागतीचे कामांना वेग आला आहे. आर्थिक परिस्थीतीमुळे शेतकऱ्याला लाभाची रक्कम जमा होण्याची आशा होती मात्र या वर्षीची रक्कम अजुनही खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहे.

* माझ्याकडे एक हेक्टर शेत असुन मी या योजनेत पात्र लाभार्थी आहे. बि- बियान, रासायनीक खताच्या किमतीत भरभसाठ वाढ झाली पेरणीचे नियोजण करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6000 रूपये खात्यात जमा होणार असल्याच सांगण्यात आले होते मागिल वर्षाचे तिन टप्पे मिळाले या वर्षीचा मात्र अजुनही एक रुपयाही खात्यात जमा झाला नाही.   
– गजानन हागे , शेतकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here