देवचंद्र सम्दुर
गोळेगाव : शेेगाव तालुक्यातील गोळेगाव येथे संघपाल सम्दुर यांनी त्यांचे वडील दिवंगत वासुदेव भिवसन सम्दुर यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त जि.प.प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घरपोच शालेय साहित्याचे वाटप केले.दिवंगत वासुदेव सम्दुर हे तालुक्यातील सर्व परिचीत सामाजिक कार्यकर्ते होते.धम्मकार्य, समाजकार्य तसेच आंबेडकरी चळवळीत त्यांचे फार मोठे योगदान होते.शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे.यासाठी त्यांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी दरवर्षी समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.यावर्षी कोरोनाच्या संकटात सापडलेल्या पालकांना हातभार लागावा म्हणून वर्ग १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी गंगुबाई सम्दुर, मुख्याध्यापक एस.एस.पिलात्रे, पुंडलिक भिवटे संचालक कृ.उ.बा.स.शेगाव, काशिनाथ गतमणे,शेखर देशमुख, शांताराम गावंडे,उमेश नांदोकार आदिंची उपस्थिती होती.