
शेगाव : संतनगरी शेगाव शहरात सोमवार १३ जुलैपासून सर्वपक्षीय तीन दिवसीय ‘जनता कर्फ्य’ चे आवाहन शनिवारी करण्यात आले होते ; मात्र त्यानंतर काही तासातच अचानक जनता कर्फ्यू तात्पुरता स्थगित करण्यात आला, अशा स्वरूपाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला. शेगाव जनता कर्फ्यू मागे का घेतला गेला? आता या मागे काही श्रेयाचे राजकारण आहे का? हे राजकारण कोण करत आहे? याबाबत ‘रियालिट चेक’ The रिपब्लिकच्या माध्यमातून आम्ही केले असता स्थानिक नेत्यांचा टोकाला गेलेला संघर्ष, कर्फ्यू चा निर्णय घेताना आमदारांना कोणतीही कल्पना न देणे, सर्वपक्षीय कर्फ्यू असला तरी त्याची माहिती सर्वांना नसणे, काहींचा विरोध तर काहींचे समर्थन अशी एक ना अनेक कारणे समोर आली आहेत. त्यामुळे हा जनता कर्फ्यू तूर्तास स्थगित झाला आहे
काही व्यापारी व नागरिकांशी आम्ही चर्चा केली असता कर्फ्यू असावा की नसावा, याबाबत वेगवेगळ्या चर्चासुद्धा पाहायला मिळाल्या. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या समन्वयाअभावी जनता कर्फ्यू सध्या तरी नाही हेच आज दिवसभराच्या निष्कर्षातून आम्हाला दिसून आले. मात्र कोरोनाच्या काळातही राजकारणी लोक जे विरोधक असो वा सत्ताधारी , जर जनतेच्या जीवाशी खेळत असतील तर त्यांना जनता नक्कीच माफ करणार नाही असा सूर सर्वसामान्य नागरिकांतून ऐकायला मिळाला.
कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत असताना काही राजकीय नेते या संकट काळातही आपली राजकीय पोळी शेकून घेण्याचा आटापिटा करत आहेत. जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. सर्वत्रश्रेयाची लढाई पाहायला मिळत आहे, असा आरोप लोक करत आहेत.
मुंबई येथील जगातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेला धारावीचा परिसर कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे.जगभरात महाराष्ट्राचे त्यामुळे कौतुक होत आहे. आपले राजकीय नेते मात्र त्याचं श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करत आहेत. जे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी, सफाई कामगार, प्रशासनातील विविध विभागातील अधिकारी अगदी चतुर्थ कर्मचारी वर्गापासून तर शिक्षकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जे परिश्रम घेत आहेत त्यांना कोरणा मुक्तीचे श्रेय देण्याची दानत राजकीय नेत्यांनी दाखवण्याची गरज आहे. परंतु असे न करता श्रेय घेण्यासाठी राजकीय आरोप-प्रत्यारोप दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरु आहेत.
शेगावातील जनता कर्फ्यू रद्द करण्यामागे कोण असेच राजकारण करत आहे काय? हे आम्ही आज तपासून पाहिले. त्यात जनता कर्फ्यू बाबत निर्णय घेताना सर्वांना विचारात घेतले गेले नाही स्थानिक आमदार ,नगराध्यक्ष हे सुद्धा या निर्णयापासून अनभिज्ञ होते, मात्र जनता कर्फ्यू असे नाव घेऊन याबाबत घाईगडबडीत निर्णय घेतला गेला. दरम्यान आज या कारणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार सोशल वार पाहायला मिळाले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मात्र या प्रकरणापासून लांबच राहतात कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
*the रिपब्लिक ‘त्या’ पत्रकाराच्या पाठिशी*
शेगाव जनता कर्फ्यू बाबतचे वृत्त सोशल मीडिया व माध्यमांना पुरवणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराला नाहक वेठीस धरण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जात आहे. एखादा चांगला प्रयत्न करताना घाई गडबडीत किंवा अनावधानाने बातमी दिली गेली असेल तर त्या पत्रकाराला टार्गेट करणे चुकीचे आहे. असे करणे पत्रकार हल्ला विरोधी कायदा अन्वये अजामीनपात्र गुन्हा आहे. या पत्रकाराला कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास बुलढाणा जिल्ह्यातील समविचारी पत्रकार तसेच ‘द रिपब्लिक’ ची सर्व टीम त्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे राहील.
सदर निर्णया करीता प्रथम लोकप्रतिनिधी व स्थानिकांना विश्वासात घ्यावे लागेल, तसेही तीन दिवस गाव बंद ठेवल्याने हा प्रश्न निकाली निघेल काय असे तुम्हाला वाटते काय? तसेही शहर बंद करण्या साठी मा.जिल्हाधिकारी किंवा प्रधान सचिव यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे , या बाबत आ. डॉ.संजय कुटे यांचे सोबत चर्चा करण्यात आली असता प्रथम शहरातील जनता व व्यापारी यांचेशी चर्चा करून जनता कर्फु ठेवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
-देवानंद उमाळे, पत्रकार शेगाव