विजय हागे : द रिपब्लिक न्युज नेटवर्क
टूनकी : संग्रामपुर तालुक्यातील सन २०१२-१३, २०१३-१४ मधे ठिबक सिंचनाचे अनुदान अदयापही शेतकऱ्याच्या खात्यात जमा न झाल्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकरी अनुदानापासुन वंचीत आहेत. पाच – सहा महिन्यात अनुदान निघेल या आशेवर बँकाचे कर्ज काढुन, उसणवारी, व्याजाने पैसे घेवून ठिबक सिंचन खरेदी केले, मात्र सात – आठ वर्षाचा कालावधी संपला मात्र अनुदानाचा लाभ न मिळाल्याने कृषी विभागाचे उंभरठे ओलांडुन शेतकऱ्यांची अनुदान मिळण्याची आशा मावळतांना दिसत आहे.
शेती व्यवसाय हा फायदेशीर व्हावा तसेच शेतकऱ्याची जोखीम कमी व्हावी, आधुनिक कृषीतंत्रला प्रोत्साहण मिळण्याकरीता खात्रीपुर्व व संरक्षीत सिंचन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.केद्र शाशणाच्या महत्वकांशी योजनेमधे सन २०१५ -१६ पासुन ‘ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ‘यात सामावीष्ठ केलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवुन प्रत्येक थेंबातुन जास्तीत जास्त उत्पादण मिळविणे हे या योजणे चा उद्धीष्ट आहे. सन २०१४-१५ पर्यंत केद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना ८०: २० या प्रमाणात होती. यामधे केद्र शाशणाचावाटा हा ८० टक्के आणि राज्य शाशणाचा २० टक्के या प्रमाणात होता. मात्र यामधे बदल करुण ६०: ४० या प्रमाणात चालु आहे. सग्रामपुर तालुक्यात सन २०१२ पासुन पावसाळा कमी प्रमाणात झाल्यामुळे जमीनीची पाणी पातळी खुप मोठ्या प्रमाणात खालवली होती. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी ठिबक सिंचनाकडे वळले होते. अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्याकडुन कंपणीने शंभर टक्के रक्कम भरूण घेतल्या, ज्या शेतकऱ्याजवळ पुर्ण रक्कम भरण्याची व्यवस्था नसेल अशा शेतकऱ्यावर बॅक लोन, प्रायवेट फायनन्स करून ठिंबक कंपनीने पैसा वसुल करून घेतला. पाच -सहा महिन्यात अनुदानाची रक्कम मिळेल या आशेवर भरपुर शेतकऱ्यांनी ठिंबक पुर्ण रक्कम भरूण खरेदी केली. मात्र सात ते आठ वर्षाचा कालावधी संपला अजुनही तालुक्यातील शेकडो शेतकरी अनुदानाची प्रतीक्षा करित आहेत.बॅका, फायनन्सची व्याजाची रक्कम वाढतच आहे. मात्र अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढून बिकट परिस्थीती निर्माण झाली आहे.
*शेतकऱ्याचे अनुदान गेल्या सात – आठ वर्षापासुन न मिळाल्याने शेतकऱ्यांची अनुदान मिळण्याची आशा संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जास्तीत – जास्त शेतकरी वर्ग विना अनुदानीत ठिबक कडे वळलेला आहे. तालुका स्तरावर ठिबक सिंचनाकरिता निधी पडुन असते ,मात्र बरेच शेतकरी शंभर टक्के रक्कम भरून अनुदानीत ठिंबक घेत नाहीत. त्यामुळे ठिबक सिंचनाचा निधी कृषी विभागातुन परत जाताना पाहायला मिळतो.
– गणेश इंगळे , शेतकरी लाडणापुर