Home Breaking News खामगावात आणखी तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’

खामगावात आणखी तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’

खामगाव ः अधिकाऱ्यांना सुचना करताना आमदार ॲड. आकाश फुंडकर.

कोरोनाची साखळी तोडण्याचा नागरीकांचा निर्धार, स्वयंस्फुर्तीने कर्फ्यूसाठी पुढाकार

खामगाव – शहरात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी तीन दिवस जनता कर्फ्यू चे आवाहन करण्यात आले होते. या जनता कर्फ्यूला शहरवासीयांनी उर्त्स्फुत असा प्रतिसाद दिला. मात्र दिवेसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत चालली असून जनता कर्फ्यूू आणखी तीन दिवस वाढविण्यात आला आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी यासाठी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत कोरोनाची साखळ तोडण्याचा दृढ निश्चय केला असल्याचे दिसून येते.
देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. बुलडाणा जिल्ह्यातही कोरोनाचे संकट अधिक गडद बनत चालले आहे. दररोज जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्ण आढळून येत असून यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात अगोदर कोरोनामुक्त असलेल्या खामगाव तालुक्यात आता मात्र कोरोनाने कहर केला असून शहर कोरोना हाँटस्पाँट बनत चालले आहे. दररोज शहरात १० ते २० कोरोना बाधित रूग्ण आढळून येत असून यामुळे प्रशासनावर ताण पडत आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असले तरी कोरोनाला आळा घालण्यात मात्र यश मिळताना दिसून येत नाही. शहरात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता १० ते १२ जुलै पर्यंत जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन खामगाव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला व्यापारी, मोबाईल असोसिएशन, बार असोसिएशन सह संपुर्ण शहरवासीयांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला. तीनही दिवस शहर कडकडीत बंद होते. असे असले तरी शहरात मात्र कोरोना बाधित रूग्णांच्या संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे रविवारी अनेक सामाजिक संघटना, विविध समाजाचे प्रमुख व अनेक नागरिकांनी शहरात आणखी काही दिवस जनता कर्फ्यू वाढवावा अशी मागणी आ.फुंडकर व प्रशासनाकडे केली होती. याचा गांभीर्यपुर्वक विचार करून रविवार दि. १२ जुलै रोजी स्थानिक नगर परिषदमध्ये दुपारी आ.फुंडकर व प्रशासकीय अधिकारी व शहरातील काही नागरिकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये खामगाव शहरात आणखी तीन दिवस म्हणजे १३ ते १५ जुलै पर्यंत जनता कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

* खामगाव शहरात टेस्टिंगची संख्या वाढविण्यात आल्यामुळे रूग्ण आढळून येण्याचे प्रमा सुध्दा वाढले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यास नागरिका चांगला प्रतिसाद दिला. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी आणखी उपाययोजना गरजेच्या असून सर्व प्रशासकीय अधिकारी व नागरिकांशी चर्चा करून आणखी तीन दिवस जनता कर्फ्यू वाढविण्यात आला आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे.
– आकाश फुंडकर, आमदार खामगाव

* जिल्‍ह्यातील स्‍वॅब तपासणीसाठी नागपूर, पुण्यात
आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ते होणार हे ओळखूनच दि.०6 जून २०२० रोजी खामगांव येथे लॅब खरेदीसाठी रु २० लक्ष निधी वर्ग करण्यात आला होता. आज जी रुग्ण संख्या वाढत आहे हयाबददत दि. १ जुलै च्या पत्रकार परिषदेतच मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना अशी परिस्थिती येईल हे भाकीत सांगितले होते. त्यांनतर आज १२ दिवस उलटूनही जिल्हा प्रशासन हयाबददल कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या मनात काय आहे हे सर्व सामान्य जनता समजलीच असेल आणि खामगांवात लॅब होऊ नये हयामागे प्रशासनाचा हेतु काय हे अद्याप समजले नाही. प्रशासनिक अधिकारी हे जनतेच्या सेवेसाठी असतात असे वाटते पण जिल्हा प्रशासनाने जनतेच्या जिवाशी खेळ लावलाय, कारण आजही जिल्हयाचे स्वॅब तपासणीसाठी नागपूर, पुणे येथे जात असल्याचे समजतेय. लॅब खरेदीला अक्षम्य दिरंगाई करणारे अधिका-यांना तमाम बुलढाणेकरांच्या प्रश्नांना उत्तर द्याव लागणार आहे, अशा इशारा आमदार आकाश फुंडकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here