Home जागर ‘त्या’ ट्रोल हेडलाईनबाबत वाचा काय म्हणाले रविंद्र आंबेकर..

‘त्या’ ट्रोल हेडलाईनबाबत वाचा काय म्हणाले रविंद्र आंबेकर..

मी लिहिली ती हेडलाइन…रवींद्र आंबेकर

बॉलीवूड मध्ये कोरोना संदर्भातील एका बातमीचा स्क्रीन शॉट सध्या व्हायरल होतोय. मॅक्समहाराष्ट्र ची ही बातमी आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोना झाला तसंच रेखा यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना झाल्यामुळे त्यांचा बंगला सील करण्यात आल्याची माहिती या बातमीत होती.

वेबवर अनेक पोर्टल संभ्रमीत करणाऱ्या बातम्या देत असतात. आम्ही सदैव या प्रकारापासून लांब राहिलो. मध्ये मध्ये आमच्या ही रिपोर्टर्स ना असं करायची हुक्की येते, पण आम्ही जाणीवपूर्वक या पासून दूर राहिलो. त्यावर आता फार काही बोलत नाही.

तर विषय अमिताभ ना कोरोना, रेखाचा बंगला सील या हेडलाइन बाबत होता. वाचकांच्या बाबतीत गेल्या काही काळापासून मी आक्षेप नोंदवत आलो आहे. बॉलीवूड मध्ये कोरोना अशी हेडलाइन आणि अमिताभ पॉझीटीव्ह, रेखा यांचा बंगला सील अशी सब हेडलाइन म्हणू अशी ही हेडलाइन होती. दोन बातम्या एकत्र देण्यामागे खोडसाळपणाचा माझा हेतू नव्हता, मात्र वाचकांच्या मनात मात्र खोडसाळ पणा जरूर होता. त्यामुळे बॉलीवूड मध्ये कोरोना ही हेडलाइन न वाचता पुढच्या बातमीवर सगळ्यांचं लक्ष गेलं.
असो, मॅक्समहाराष्ट्र ने गेल्या तीन महिन्यात देशातील शोधपत्रकारांच्या मदतीने काही रिपोर्ट प्रसारित केले आहेत. वायर, caravan, द प्रिंट, लाइव्ह लॉ तसंच इतर अनेक नामांकित पोर्टल सोबत टाय-अप करून दर्जेदार रिपोर्ट प्रसारित केले आहेत. अनेक ग्राऊंड रिपोर्ट आणि माहितीपर व्लॉग प्रसिद्ध केले आहेत. या सर्व दर्जेदार व्हिडीयो-मजकूर यांचा रिच आणि कालच्या केतकी चितळे-अमिताभ, रेखा बातमीचा रिच यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ज्यांना चिल्लर बातम्या म्हटलं गेलंय त्या बातम्यांचा रिच जवळपास 500 टक्क्यांनी जास्त आहे. ज्या दर्जेदार बातम्या आहेत त्यांना वेबसाइट वर 1000 वाचक मिळणे ही कठीण आहे.

मला प्रश्न पडलाय की मला पत्रकारितेचे धडे देणारे वाचक नक्की बोलतात काय आणि वाचतात काय.. शहाणपण शिकवायला सोप्पं असतं. मी फार लक्ष देत नाही अशा प्रवृत्तींकडे. एकतर चांगलं कंटेट वाचायचं नाही, त्यासाठी पैसे ही द्यायचे नाहीत मात्र आपण किती चांगले आणि चोखंदळ आहोत हे दाखवण्यासाठी सोशल मिडीयावर कमेंट मात्र करत राहायचं. अशा प्रवृत्तींचा निषेध करावा तितका थोडाच आहे.

असले फर्जी वाचक असले काय आणि नसले काय.. अशा लोकांनी अनफॉलो केलं तरी माझी काही हरकत नाही. आपलं करिअर पणाला जाऊन, जीवाची जोखिम स्वीकारून माझे सहकारी गेले 4 वर्षे काम करतायत ते असल्या बोगस वाचकांसाठी नाही.

मी स्वतः सायंदैनिकात काम केलंय. त्यामुळे हेडलाइनशी खेळण्याचा प्रकार मला माहित आहे. न्यूजी आणि क्रीस्पी हेडलाइन्स देणं हे पत्रकाराचं कसब मानलं जातं. फेक न्यूज आणि संभ्रमीत करणाऱ्या बातम्या देणं आणि वस्तुस्थितीला धरून हेडलाइन देणं यात फरक आहे. कुणाला काही त्रास होवो, मला यात काही गैर वाटत नाही. झाला विरोध तर झाला.माझ्यावर टीका करण्याआधी जरा स्वतःची टाइमलाइन निरखून पाहा. मॅक्समहाराष्ट्र च्या विरोधात कँपेन करणाऱ्यांची टाइमलाइन पाहिली तर तुम्हाला विशेष पद्धतीच्या पोस्ट दिसून येतील. अशा लोकांकडून पत्रकारिता शिकावी इतके काही वाईट दिवस आलेले नाहीत.

जाता जाता एक प्रश्न ( या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्यानेच माझ्या पोस्ट वर कमेंट करावी ) –

मॅक्समहाराष्ट्र ने रिपोर्टर्स कलेक्टिव सोबत केलेल्या सिरिजचा विषय काय होता ?

—असा खुलासा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक जेष्ठ पत्रकार रविंद्र आंबेकर यांनी केला आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here