Home राजकारण … असं काय केलं सरकारनं धारावीत की WHO ने केले कौतुक

… असं काय केलं सरकारनं धारावीत की WHO ने केले कौतुक

द रिपब्लिक न्युज नेटवर्क
कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरातल्या बहुतांश देशांमध्ये वाढतो आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया या देशांनी करोना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत ते चांगले आहेत असं WHO ने म्हटलंय. अशातच जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने करोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईतल्या धारावी मॉडेलचंही कौतुक केलं आहे. धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी धारावी मॉडेलही महत्त्वाचं आहे असं WHO चे प्रमुख टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.

काय आहे धारावीचा पॅटर्न?

  • करोनाच्या चाचण्या करणे
  • रुग्णांचा शोध घेणे
  • रुग्णांचा शोध घेऊन त्यांचं अलगीकरण
  • करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठीचे प्रयत्न

सोशल डिस्टन्सिंग पाळणेया महत्त्वाच्या सूत्रांचा वापर करुन धारावीने एक मॉडेल तयार केलं. ज्यामुळे करोनाची संख्या दाट लोकवस्ती असूनही कमी करण्यास मदत झाली. धारावीच्या या पॅटर्नचं WHO ने कौतुक केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here