Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट बुलडाणा जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हचा आकडा अचंबित करणारा

बुलडाणा जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हचा आकडा अचंबित करणारा

द रिपब्लिक न्युज नेटवर्क
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्ववारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 443 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 411 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 32 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 13 व रॅपिड टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 129 तर रॅपिड टेस्टमधील 282 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 411 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह अहवालामध्ये नांदुरा येथील 28, 45 व 58 वर्षीय पुरूष, डोणगांव ता. मेहकर येथील 35 वर्षीय पुरूष, रोहीदास नगर मलकापूर येथील 25, 30 व 12 वर्षीय महिला, शिवाजी नगर मलकापूर येथील 35 वर्षीय पुरूष, बालाजी मंदीराजवळ मेहकर येथील 24 व 30 वर्षीय पुरूष, खामगांव येथील 45 व 60 वर्षीय पुरूष, जलालपूरा खामगांव येथील 52 वर्षीय पुरूष, वाडी खामगांव येथील 35 वर्षीय पुरूष, नांदुरा येथील 76 वर्षीय महिला संयशीतांचे अहवालांचा समावेश आहे. तसेच सती फैल खामगांव येथील 47 वर्षीय पुरूष, बाळापूर फैल खामगांव येथील 25 वर्षीय पुरूष, वडगांव माळी त. मेहकर येथील 40 व 51 वर्षीय पुरूष, 46, 35 व 80 वर्षीय महिला, सोनाळा ता. संग्रामपूर येथील 58 वर्षीय पुरूष, बालाजी फैल शेगांव येथील 62 वर्षीय पुरूष, जानोरी ता. शेगांव येथील 24 वर्षीय पुरूष, अमृत बाग खामगांव येथील 10 वर्षीय मुलगी, केला नगर खामगांव येथील 43 वर्षीय पुरूष, पोस्ट ऑफीसजवळ खामगांव येथील 44 वर्षीय पुरूष, खामगांव येथील 31 व 55 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष, जलंब नाका खामगांव येथील 25 वर्षीय पुरूष पॉझीटीव्ह आले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 32 रूग्ण आढळले आहे.
त्याचप्रमाणे आज उपचारादरम्यान मस्तान चौक खामगांव येथील 65 वर्षीय पुरूष व रेणुका मंदीराजवळ चिखली येथील 55 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 8 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये आळसणा ता. शेगांव येथील 35 व 28 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय महिला, 8 व 3 वर्षीय मुलगी, मूळ पत्ता जळगांव खांदेश असलेले 28 वर्षीय पुरूष, जामठी धाड ता. बुलडाणा येथील 26 वर्षीय महिला व इंदिरा नगर चिखली येथील 55 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 4381 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 235 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 235 आहे.
आज रोजी 87 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 4381 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 445 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 235 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 193 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 17 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here