Home संग्रामपूर परिसर वाचा..! का केली शिक्षकाने आत्महत्या

वाचा..! का केली शिक्षकाने आत्महत्या

आकाश पालीवाल : द रिपब्लिक न्युज नेटवर्क
पातुर्डा : संग्रामपुर तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील हड्यामाल येथील जि.प. मराठी शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या 38 वर्षीय शिक्षकाने वरवट बकाल एकलारा रस्त्यालगत शेतातील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली.
आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव संतोष रामदास खोरणे असून ते मेहकर तालुक्यातील आरेगाव येथील रहिवासी आहेत. तर ते हल्ली वरवट बकाल येथे राहत असून येथुन जवळच असलेल्या आदिवासी बहुल गाव हाड्यामाल येथील शाळेत ते शिक्षक पदावर कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्व् भूमीवर लॉकडाऊन काळात तंत्रस्नेहि म्हणुन शिक्षक खोरणे हे विध्यार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन प्रवेश प्रक्रिया व शालेय कामकाजानिमित्त सदर शिक्षक वरवट बकाल येथे मुक्कामी होते. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर शिक्षकाने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here