Home संग्रामपूर परिसर फुलपाखरांची दरवर्षी घटते आहे संख्या : वाचा काय आहे कारण

फुलपाखरांची दरवर्षी घटते आहे संख्या : वाचा काय आहे कारण

दिपक हागे : द रिपब्लिक न्युज नेटवर्क
टूनकी : फुलपाखरांमध्ये काही फुलपाखरे अशी असतात की ज्यांचे रूप निसर्गातील बदलांप्रमाणे बदलते. फुलपाखरू हा एक आकर्षक रंगांचा पंख असलेला एक कीटक आहे.कीटकांना डोके,पोट आणि छाती हे अवयव असतात. फुलपाखराला या जोडीने पंख आणि मिशा असतात. फुलपाखरे मिशानी वास घेतात तर पायाने चव ओळखतात.फुलपाखरं आपल्याला निसर्गात अगदी सहज ओळखायला येतात ते त्यांच्या विशिष्ट लकबीमुळे. जमिनीवर बसताना ते एकतर त्याच्या रंगाशी मिळतेजुळते असे क्षेत्र म्हणजे वाळून गेलेली पाने असलेली जागा निवडतात. शिवाय ती कधीही स्वस्थ बसत नाहीत. इतर फुलपाखरांप्रमाणे पंख उघडझाप करतातच. शिवाय सारखी स्वत:भोवती गिरक्याही घेत राहतात. एका गिरकीत ज्या बाजूला डोके असते त्याच्या विरुद्ध बाजूला ते जातात. ही गिरकी १८० अंशात असते. म्हणून त्यांना नाचरे फुलपाखरू असेही म्हणतात. अर्थात ते सर्व भक्षकांना चकविण्यासाठीच असते. सतत हवेत भिरभिरणारं आणि अगदी कमी काळाचं जीवनचक्र असलेलं फुलपाखरू हा म्हटलं तर निसर्गातला अगदी किरकोळ घटक. पण या किरकोळ घटकामध्येदेखील निसर्गाने थक्क करून सोडणारं वैविध्य निर्माण केलं आहे, जैवविविधतेच्या साखळीमधल्या या इवल्याशा जिवाच्या महाराष्ट्रात २४७ प्रजाती सापडतात.फुलपाखरे ही अवस्था उपयोगी आहे कारण हे कीटक फुलांना इजा न करता फक्त त्यांतील मध खातात. या वेळी त्यांच्या पायाला फुलांतील परागकण चिकटतात. फुलपाखरे जेव्हा दुसऱ्या फुलावर मध खाण्यासाठी बसतात त्या वेळी हे परागकण त्या फुलातील किंजल्कावर (स्त्री-केसराच्या टोकावर) पडून फलधारणा होते.परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे फुलपाखरू आहे म्हणून शेतकरी आहे. हंगामामधे कापुस, सोयाबीन, उळीद, मुग, तुर, पिकांना फुलाच्या अवस्थेमधे झाडावरील फुलामधे पराग कणाची देवान – घेवान करण्यास महत्वाची भुमीका असते. मात्र प्रदुषण,रासायने आणि किटकनाशकाचा वापर वाढतच असल्याने फुलपाखराची संख्या दरवर्षी घटत आहे. अशी घटत असलेली संख्या पाहता शेतकऱ्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे.

*राष्ट्रीय प्राणी वा पक्षी म्हणून एखाद्या पक्षी प्राण्याला गौरवले जाते फुलपाखराकडे मात्र आजपर्यंत दुर्लक्षच झाले आहे. राष्ट्रीय वा राज्यस्तरीय फुलपाखरू म्हणून कोणत्याही फुलापाखराला मान मिळालेला नाही.फुलपाखरांचे अभ्यासक व निसर्ग प्रेमींमार्फत राज्य फुलपाखरू म्हणून ब्लू मॉरमॉन या प्रजातीचा विचार करण्याची मागणी झाल्यावर २२ जून, २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे.
– विजय हागे, निसर्गप्रेमी, लाडणापुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here