द रिपब्लिक न्युज नेटवर्क
पहुरजिरा : आज कोरोनाचे मोठे संकट असल्यामुळे अनेकांचे व्यवसाय डुबले, रोजगार डुबले, शेतातील माल बेभाव विकावा लागला त्यामुळे सर्व आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे कोरोना काळातील विद्युत बिल माफ करावे तसेच विदर्भावासीयांना 200 युनिट पर्यंतची विद्युत मोफत द्या, २०० युनिट नंतरचे विद्युत दर निम्मे करा, शेती पंपाचे विद्युत बिल अव्वाच्या सव्वा असल्यामुळे ते कमी करावे या मागण्या घेऊन आझाद सेनेचे कार्यकर्ते व पहुरजिरा येथील गावकऱ्यांनी विजबिलाची होळी करून शासनाचा निषेध केला.
या आंदोलनाला विदर्भ राज्य आंदोलन समिती व आझाद सेनेने पाठिंबा दिला होता. सदर आंदोलनात युवा आघाडी आझाद सेनेचे गणेश सडतकार, आमिर शाह, अनिल गव्हांदे, संजय फाटे, एकनाथ उचाळे, घनश्याम पहुरकर, रवींद्र तायडे, श्यामभाऊ गायकवाड, गणेश खारोडे, नंदू सडतकार, विजय वाशिमकार, दिलीप पहुरकर, नंदू कोंडे तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.