Home Breaking News मुलगा झाल्याचे पेढे खाणे पडले महागात : इतक्या जणांना व्हावे लागेल क्वाँरटाईन

मुलगा झाल्याचे पेढे खाणे पडले महागात : इतक्या जणांना व्हावे लागेल क्वाँरटाईन

द रिपब्लिक न्युज नेटवर्क
मुलगा झाल्याच्या आनंदात एका  युवकाने  गावात व मित्रमंडळीना पेढे वाटले. सदर युवक पुढे कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने पेढे खाणाºया 116 जणांना होम क्वारंटाईन केले आहे.
औरंगाबाद येथील एका कंपनीत काम  करणाºया 24 वर्षीय युुवकाला मुलगा झाला. मुलाला पाहण्यासाठी तो ४ जुलै रोजी काटकळंबा येथे गेला.त्याच्या कुटूंबातील आई, वडील, भाऊ, बहीण व मामा, मामीला भेटून मुलगा झाल्याच्या आनंदात गावात मित्रमंडळीत त्याने पेढे वाटले. त्यामुळे त्याच्या संपर्कातील 116 जणांना आतापर्यंत आरोग्य विभागाच्या वतीने होम क्वारंटाईन केले गेले आहे. तर त्यांच्या कुटूंबासह मामा, मामी, सलुनचालक यांच्याशी संपर्क झाल्याने 9 जणांना कंधार येथे स्वँब घेण्यासाठी हलविण्यात आले.  या घटनेमुळे काटकळंबा गावात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here