सागर कापसे : द रिपब्लिक न्युज नेटवर्क
संग्रामपुर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आले परंतु संग्रामपुर तालुक्यात आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन याला हरताळ फासण्याचे काम करित असून वरवट खंडेराव येथील रहिवासी व रायगड येथे विद्युत वितरण कार्यालयात वायरमण घरी आला असून दोन दिवस मुक्काम केल्यानंतर त्याची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्या व्यक्तीची कोरोना चाचणी केली असता सदर व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील ११ व्यक्ती क्वारंटाईन केले असून तो परिसर सील करण्यात आला आहे. परंतु या झोनमध्ये नागरिकांना राण मोकळे असल्याचे दिसून येत आहे. तर स्वॅब्ा घेतलेल्या ११ व्यक्ती पैकी ५ व्यक्ती रॅपीड टेस्टमध्ये निगेटीव्ह आले. मात्र उर्वरित ६ व्यक्तीचा रुग्णवाहिके अभावी स्वॅब घेण्यास विलंब होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या व्यक्तींचे आता काय अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे.