द रिपब्लिक न्युज नेटवर्क
बुलडाणाः पत्नी भांडण करते व माहेरी निघून गेली या कारणावरुन एक पठ्ठ्या डायरेक्ट बीएसएनएल’च्या सुमारे तीनशे फूट उंच टॉवर वर चढल्याची घटना बुलडाणा येथे घडली आहे.
जवळच असलेल्या सव येथील एक युवक बीएसएनएल’च्या सुमारे तीनशे फूट उंच टॉवर वर चढला आहे. गेल्या तीन तासापासून त्याने प्रशासनाला वेठीस धरले असून सर्वत्र या प्रकाराची चर्चा चालत आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील या गावातील गजानन रोकडे हा युवक अचानक बीएसएनएलच्या टॉवरवर चढला अनेकांनी प्रयत्न करूनही तो खाली उतरायला तयार नाही. त्याची पत्नी भांडण करते व माहेरी निघून गेली. त्यामुळे ती येईपर्यंत उतरणार नसल्याची चर्चा घटनास्थळी होती. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. काही काळ त्याने मोबाईल वरून लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर त्याने मोबाईलही खाली फेकून दिला. त्यामुळे आता हा पठ्ठया कधी खाली उतरतो हे पाहण्यासाठी गर्दी जमा झालेली आहे.