Home Breaking News या व्‍यक्‍तीने पकडून दिला काळ्या बाजारात जाणारा तांदुळ

या व्‍यक्‍तीने पकडून दिला काळ्या बाजारात जाणारा तांदुळ

द रिपब्‍लिक न्‍युज नेटवर्क
खामगाव ः रेशन दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष रवि महाले यांनी काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदुळ पकडून दिला. पुरवठा विभागाच्‍या अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन सदर तांदुळ जप्‍त केला आहे.
सध्या रेशनच्‍या तांदुळाचा मोठ्या प्रमाणावर काळा बाजार सुरु आहे. लॉकडाउनमध्ये रेशनकार्ड धारकांना प्रतिव्‍यक्‍ती ५ किलो तांदुळ मिळत असून काही नागरिक हा तांदुळ विकत आहेत. अनेक ठिकाणी रेशनचा तांदुळ घेणारे लोक फिरतात. १० रुपये प्रति किलोप्रमाणे ते कार्डधारकांकडून तांदुळ घेऊन बाजारात जास्‍त दराने विकतात, असे प्रकास वाढीस लागले असून तालुक्‍यात गत काही दिवसात अशा काही घटना समोर आल्‍या आहेत.असाच एक प्रकार काल पुन्‍हा उघडकीस आला. रेशन दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष रवि महाले यांनी तत्‍काळ पाठलाग करुन रावणटेकडीनजीक ऑटो क्रमांक एमएच १२ डिटी ०२९५ ला थांबवून चौकशी केली असता ऑटोत मोठ्या प्रमाणावर तांदुळ दिसून आला. यावेळी महाले यांनी लगेच पुरवठा निरीक्षक भगत व शिवाजी नगर पोलिसांना घटनास्‍थळी बोलावून सदर ऑटो चालकास त्‍यांच्‍या ताब्‍यात दिले. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक यांच्‍या तक्रारीवरुन शेख आबीद शेख हमीद रा. मुक्‍ताईनगर याचेवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here