द रिपब्लिक न्युज नेटवर्क
खामगाव ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून खामगाव शहरात आणखी नवे ७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. यामुळे खामगावकरांना धोका अधिक वाढला आहे.
खामगाव शहर हे सध्या कोरोनाचे केंद्रबिंदु बनले असून शहरात दररोज कोरोना रुग्ण आढळुन येत आहेत. दरमयान काल एका स्वर्गरथाचा चालक रॅपीड टेस्टद्वारे पॉझिटीव्ह आढळला होता. यामुळे त्याच्या कुटूंबियांचीही तपासणी करण्यात आली असून त्याची पत्नी व मुलगा पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच शहरालगत असलेल्या सुटाळा बु. मधील एका लॅबचा टेक्नीशियन, एका मेडिकल चालकाचा भाऊ देखील पॉझिटीव आढळला असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे आधीच्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले वेगवेगळ्या ठिकाणचे ३ असे एकुण ७ जण रॅपीड टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आले आहेत. या नवीन रुग्णांमुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ५१ वर पोहचली असून ही चिंताजनक बाब आहे.