Home शैक्षणिक online Education : मोबाईलसाठी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी : कैलास फाटे

online Education : मोबाईलसाठी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी : कैलास फाटे

द रिपब्लिक न्युज नेटवर्क
खामगाव : कोरोनाचे संकट देशभर झपाट्याने पसरत आहे. त्यामध्ये सर्वच स्थरावरील आर्थिक उलाढाल कोलमडली आहे. त्यात यावर्षी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यात शंका नाही पण ते नुकसान ऑनलाईन अभ्यासक्रमाने भरून निघेल का ? सर्वच नागरिकांकडे मोबाइल असतील अस नाही आजही आपल्या देशात अनेकांच्या नशिबी दारिद्री आहे.

     आपलं पोट कस भराव या विवंचनेत मध्यमवर्गीय आहेत. त्यात शेतकरी तर मेटाकुटीला आला आहे. आता सरकार ऑनलाईन अभ्यासासाठी आग्रही आहे. पण मध्यम वर्गीयांनी आपल्या मुलांना मोबाईल कोठून घेऊन द्यावा ? की मुलांना अशिक्षित ठेवावं, हे संकट आता शेतकऱ्यावर आला आहे. त्यामुळे सरकारने ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत विचार करावा अशी मागणी शेतकरी नेते तथा आझाद सेना संस्थापक अध्यक्ष कैलास फाटे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here