Home Breaking News Good news : कोरोना तपासणी आता बुलडाण्यात

Good news : कोरोना तपासणी आता बुलडाण्यात

द रिपब्लिक न्युज नेटवर्क
बुलडाणा : सद्यस्थितीत जिल्ह्यात RT-PCR प्रयोगशाळा नसल्याने कोविड -19 आजाराच्या चाचणीसाठी स्वॅब नमुने अकोला, अमरावती, यवतमाळ व नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठ‍विण्यात येत आहे. परिणामी, प्रयोगशाळेचे अंतर जास्त असल्यामुळे तपासणी अहवाल प्राप्त होण्यास 6 ते 7 दिवसांचा विलंब लागत आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने बुलडाणा येथे RT-PCR प्रयोगशाळा स्थापन करण्याची नितांत आवश्यकता होती. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावतीने शासन स्तरावर मागणी करण्यास सांगून शासनाकडून प्रयायेगशाळेकरीता तात्काळ मंजूरी प्राप्त करून घेतली आहे. स्त्री रुग्णालय येथे RT-PCR प्रयोगशाळा लवकरच स्थापन होणार आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.
या बाबतचा शासन निर्णय 9 जुलै 2020 रोजी निर्गमित झाला आहे. RT-PCR प्रयोगशाळा उभारणीसाठी आवश्यक असलेला अंदाजित रुपये एक कोटी दहा लक्ष (१.१० कोटी) इतका निधी जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या प्रयोगशाळेसाठी लागणारी आयसीएमआर संस्थेने ठरवून दिलेली यंत्रसामग्री हाफकिन बायो फार्मासिटिकल लि. मुंबई यांचे दर करारानुसार जिल्हास्तरावरून खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या RT-PCR प्रयोगशाळेसाठी लागणारे आवश्यक त्या 14 तांत्रिक मनुष्यबळ व त्यावरील खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपलब्ध निधीतून करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. याबद्दल पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here