Home कृषी शासनाच्या धोरणा विरोधात कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस बंद

शासनाच्या धोरणा विरोधात कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस बंद

आकाश पालीवाल

पातुर्डा : शासन च्या धोरणा विरोधात संग्रामपूर तालुक्यातील कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस कृषी केंद्र बंद चा पवित्रा घेतला असून आज पहिल्या दिवशी तालुक्यातील सर्व कृषी केंद्र 100 टक्के बंद होते. बऱ्याच ठिकाणी शेतकरी यांचे सोयाबीन बियाणे निघाले नाही कारण त्याची उगवण शक्ती कमी होती. यामुळे शेतकरी यांचे बरेच नुकसान झाले म्हणून त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज केले. मात्र या बाबतीत कृषी केंद्र धारकाची कोणतीही गलती नसताना तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालय कडून शेतकरी यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी,अथवा बियाणे बदलून द्यावे असे सांगितल्या गेले नाहीतर तुमच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे निर्देश तालुका कृषी कार्यालय व कृषी विभाग मार्फत देण्यात आले.
शासकीय नियमनुसार ज्या उत्पादक कंपनीला शासनाने परवानगी दिली आहे. आम्ही तेच कंपनीचे बियाणे विकतो कारण ते तर शासनाच्या निगराणीत प्रयोग करून सील बंद केले जाते तेव्हाच शासन त्या कंपनी ला विकण्याची परवानगी देते,बियाणे उत्पादन प्रकियेत आमचा कोणताही संबंध नाही आहे. यामध्ये उत्पादक शेतकरी,उत्पादक बियाणे कंपनी,शासकीय बियाणे प्रामाणिकरण संस्था,शासकीय बियाणे परिक्षण प्रयोगशाळा हे असतात त्यामुळे यांची चौकशी व्हावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा कृषी अधिकारी बुलडाणा यांना संग्रामपूर तालुक्यातील कृषी केंद्र मालक यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here