Home Breaking News अरे हे काय ? अर्भक नसून ती निघाली चक्क बाहुली ; शवविच्छेदनावेळी...

अरे हे काय ? अर्भक नसून ती निघाली चक्क बाहुली ; शवविच्छेदनावेळी झाले स्पष्ट

खामगाव : तालुक्यातील बोरजवळा येथील तलावात अर्भक मृतावस्थेत सापडले असल्याची माहिती पसरताच सर्वत्र खळबळ उडाली होती. यावेळी पोलिस, पोलिस पाटील आणि ग्रामस्थांनी या अर्भकाला येथील सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टमसाठीआणले होते. दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून देखील या अर्भकाचे पोस्टमार्टम सुरु करण्यात आले. मात्र यावेळी हे अर्भक नसून एक बाहूली असल्याचे समोर आले. या प्रकाराची दिवसभर जोरदार चर्चा सुरु होती.
खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनअंतर्गत येणा-या बोरजवळा येथील तलावामध्ये गुरुवार दि.९ जुलै रोजी रात्री एक मुलीच्या जातीचे अज्ञात अर्भक आढळून आले. यामुळे गावात विविध शंकांना पेव फुटला होता. अनैतिक संबंध आणि कुमारी मातेचे हे कृत्यु अशा अनेक चर्चा सुरु असतानाच पिंपळगाव राजा पोस्टेचे ठाणेदार सचिन चव्हाण यांनी माहिती मिळताच घटनास्थळाची पाहणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस पाटिल आणि गावातील नागरिकांच्या मदतीने सदर अर्भकाला पोस्पोस्टमार्टमसाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. पोलिसांनी दवाखान्यात आणलेल्या अर्भकाचे सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनीही पोस्टमार्टम सुरु केले. यावेळी बाहुल्याच्या आतील स्पंच बाहेर आल्याने हे अर्भक नसून बाळासारखे दिसणारे बाहुले असल्याचे समोर आले. यानंतर गावातील व पोलिस हा प्रकार कुणी केला याचा शोध घेत आहे. दरम्यान या प्रकाराची शहरासह तालुक्यात दिवसभर चर्चा सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here