Home Breaking News खामगाव शहरात ‘जनता कर्फ्यू’ ला प्रतिसाद

खामगाव शहरात ‘जनता कर्फ्यू’ ला प्रतिसाद

खामगाव : शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून शहर हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. ही अतिशय चिंतेची बाब असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी तीन दिवस जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी १० जुलै रोजी चांगला प्रतिसाद मिळाला असून कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यापारी, दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.
देशासह संपुर्ण जगावर आज कोरोना महामारीचे संकट कोसळले आहे. बुलडाणा जिल्ह्यातही कोरोनाने कहर केला असून मलकापूर प्रमाणेच खामगाव शहर कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. गत काही दिवसापासून शहरात दररोज कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढत आहे. वेळीच प्रतिबंध न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक झाले आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी शहरात जनता कर्फ्यू लावावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. याबाबत नगर परिषदमध्ये काही दिवसांअगोदर महसूल, पोलिस, नगर परिषद, आरोग्य प्रशासन, लोकप्रतिनिधींची बैठकही पार पडली होती. मात्र काही कारणास्तव जनता कर्फ्यू बाबत कोणताही ठोस निर्णय यावेळी झाला नसल्याची माहिती आहे. दरम्यान शहरातील मोबाईल व कपडा व्यावसायीक संगठनांनी १० ते १२ जुलै पर्यंत प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेवून जाहीर केला होता. यानंतर आमदार आकाश फुंडकर यांनी याच धतीaवर निर्णय घेवून नागरीकांनी तीन दिवस जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन केले होते. याला शहरवासीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत आहे. जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी शहरातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाणरे लोक आढळून आले. शहरातील रस्त्यावर फळ विव्रेâता, पेâरीवाले यांच्यासह सर्व व्यापारी व इतर प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. केवळ दवाखाने, मेडिकल, पेट्रोल पंप आदी अत्यावश्यक सेवा सुरु होती तसेच बँका सुरु होत्या. तर पुढील दोन दिवसात नागरीकांची असेच सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here