Home Breaking News खामगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यु 

खामगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यु 

खामगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यु

 कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे : आमदार आकाश फुंडकर

खामगाव- शहरात कोरोनाचा धोका वाढत असून दररोज नवनवीन रुग्णआढळून येत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब असून  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी तीन दिवस जनता कर्फ्यु पाळावा असे, आवाहन आमदार ऑड आकाशदादा फुंडकर यांनी केले आहे
 याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  मलकापूर प्रमाणेच खामगाव शहर कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील कोरोना रुग्ण संख्या वाढतच आहे. गत काही दिवसापासून शहरात दररोज कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाचा धोका अधीक वाढत आहे. वेळीच प्रतिबंध न केल्यास परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यावश्यक झाले आहे. तरी शहरातील सर्व व्यापारी, व्यवसायिक, तसेच नागरीकांनी उद्या शुक्रवार, शनिवार, व रविवार  असे तीन दिवस स्वयंसपूर्तीने जनता कर्फ्यु पाळावा असे आवाहन आ फुंडकर यांनी केले केले आहे. या काळात नागरीकांनी स्वतःची व परिवाराची सुरक्षा लक्षात घेता घरातच राहवे .अत्यावश्यक काम नसल्यास घरा बाहेर पडू नये सर्वांनी जबाबदारी म्हणून हा जनता कर्फ्यु पाळल्यास आपण नक्कीच कोरोना हरवू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here