Home राजकारण प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये – आमदार आकाश फुंडकर

प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये – आमदार आकाश फुंडकर

खामगाव : बुलढाणा जिल्हा कोरोणाचा हॉटस्पॉट बनत चालला असतांनाही प्रशासन हे नागरिकांची जीवाची पर्वा न करता अक्षम्य चुका करीत असून नागरीकांच्या जीवाशी खेळत आहे. जिल्हयातील तपासणीसाठी पाठविण्यात आलेले १०० च्यावर स्वॅब नमुने खराब झाले असून त्यांचे नमुने पुन्हा घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे कोरोना संशयीतांमध्ये त्यांच्या कुटूंबांमध्ये व संपर्कातील नागरीकांमध्ये प्रचंड तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कदमापूर आणि पळशी येथील 21 जणांचे तपासणी अहवाल ६ दिवस उलटूनही न मिळाल्यामुळे कुटूंबीय प्रचंड तनावात आले त्यामुळे हया संशयीतांमध्ये लहान मुल असल्यामुळे त्यांनी कालपासून प्रशासनाबददल रोष व्यक्त केला त्यामुळे प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून प्रशासनाने हया लोकांच्या रॅपीड टेस्ट करुन त्यांना सुटी देण्याचा अत्यंत बेजबाबदारपणाचा ‍ व कोरोना संकट वाढीची शक्यता निर्माण करणारा असा निर्णय घेतला असून हा निर्णय घेणा-या अधिका-यावर तसेच हया आपात काल परिस्थितीत एक एक क्षण महत्वाचा असतांना मागील २२ दिवसापासून मंजूर असूनही स्वॅब टेस्टींग मशीन आपल्या हेकेखोरपणामुळे खरेदी न करणा-या जिल्हा शल्य चिकीत्सकांवर तात्काळ कारवाई करुन स्वॅब टेस्टींग मशीन खरेदी करण्यात येऊन ती तात्काळ सामान्य रुग्णालय खामगांव येथे कार्यान्वीत करावी व प्रशासनाने नागरीकांच्या जिवाशी चालवलेला खेळ तात्काळ बंद करावा अशी मागणी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केली आहे.
‍दि. १ जुलै २०२० रोजी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांचा बेजबाबदार पणा चव्हाटयावर आणला. हया पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासन स्वॅब टेस्टींग मशीन खरेदीस अक्षम्य दिरंगाई करीत असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते, यासोबतच स्वॅब टेस्टींग नमुने जिल्हयाबाहेर अकोला, यवतमाळ येथे जात असून हयाठिकाणी पोहचे पर्यंत ते खराब होण्याची शक्यता देखील आमदार आकाश फुंडकर यांनी हया पत्रकार परिषदेत वर्तवली होती. परंतु हया आपातकाल परिस्थितीत एक एक क्षण महत्वाचा असतांना जिल्हा प्रशासन वेळकाढू पणा करीत आहे. वैद्यकीय सामुग्री, उपकरणे खरेदी करण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये यासाठी कोव्हीड १९ काळात जिल्हा स्तरीय समितीला विशेष अधिकार प्रदान केले आहे. परंतु अशा ही परिस्थितीत जिल्हा प्रशासन नियमांची पुंगी वाजवण्यात व्यस्त आहे.
हे सर्व जीवघेण असून नागरीकांच्या हाल अपेष्टांशी प्रशासनाला काही सोयर सुतक नाही. कदमापूर येथील लहान मुलाच्या आई वडीलांच्या काल भावना अनावर होऊन त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला व्यथा मांडली व मुलांना घरी आणण्यासाठी त्या मातेने टाहो फोडला असे असतांना जिल्हा प्रशासन आपल्याच मग्रुरीत राहून स्वॅब टेस्टींग मशीन खरेदी करण्याबाबत कोणताही निर्णय त्यांनी घेतला नाही व त्या मुलांचे ६ दिवस उलटूनही स्वॅब नमुनयाचे रिपोर्ट आले नाही. जिल्हयातील १०० च्या वर स्वॅब नमुने खराब झाले असल्याचे समोर आल्यामुळे त्या मातेच्या मनावर प्रचंड ताण आला व प्रशासनाला जाब विचारायला निघालेल्या त्या २१ कोरोंटाईनचे स्वॅब नमुने पाठवून रिपोर्टची वाट पाहण्यापेक्षा प्रशासनाने प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्यांची रॅपीड टेस्ट करुन त्या आधारावर त्यांना सुटी देऊन केवळ खामगांव तालुक्यातच नव्हे जिल्हाभरातील कोरोनाचे संकट वाढविले आहे. हे सर्व प्रकरण गंभीर असून नागरीकांच्या जीवाशी खेळ करणारे आहे कारण रॅपीड टेस्ट हे कोरोना संशयीतांना सुटी देण्यासाठी प्रबळ कारण नाही. त्यामुळे हे १०० ते १२५ स्वॅब नमुने खराब झाल्याबददल व मागील २० दिवसापासून स्वॅब टेस्टींग मशीन खरेदी करण्यात अक्षम्य दिरंगाई करणा-या जिल्हा शल्य चिकीत्सकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व आपाल परिस्थिती पाहता स्वॅब टेस्टींग मशीन खरेदी करण्यात येऊन ती तात्काळ विनाविलंब खामगांव येथे कार्यान्वीत करण्यात यावी. अन्यथा येत्या काळात कोरोना संदर्भात उदभवणा-या परिस्थितीस जिल्हा प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असूनही वेळ गेलेली नाही. नागरीकांच्या जिवाचा विचार करावा दिवसरात्र झटणा-या आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, पोलीस अधिकारी, सफाई कामगार, न.प. प्रशासन हया कोरोना योध्दयांच्या मागील ३ महिन्या पासूनच्या मेहनतीवर आपल्या गलथान कारभाराने हयावर पाणी फेरु नये अशीही मागणी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here