Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट बापरे… ! बुलढाणा जिल्ह्यात 43 पॉझीटीव्ह रुग्ण

बापरे… ! बुलढाणा जिल्ह्यात 43 पॉझीटीव्ह रुग्ण

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी काल रात्री व आज असे एकूण १३३ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी १०५ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 28 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. तसेच आजपासून रॅपीड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे कोरोना निदान करणे सुरू करण्यात आले आहे. या टेस्टच्या माध्यमातून आज 91 अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामध्ये 76 निगेटीव्ह व 15 पॉझीटीव्ह अहवाल आहेत. अशाप्रकारे प्रयोगशाळेतून व रॅपीड टेस्टद्वारे एकूण 224 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामधून एकूण 181 निगेटीव्ह अहवाल प्राप्त असून 43 अहवाल पॉझीटीव्ह आहेत.
प्रयोगशाळेतून प्राप्त पॉझीटीव्ह अहवालामध्ये दाल फैल खामगाव येथील 35 व 26 वर्षीय पुरूष, वाडी खामगांव येथील 22 व 50 वर्षीय महिला, सती फैल खामगांव येथील 38 वर्षीय पुरूष, 75, 85 व 50 वर्षीय महिला, नांदुरा येथील 45 वर्षीय पुरूष, सिव्हील लाईन खामगांव येथील 45 वर्षीय पुरूष, हिवरखेड ता. खामगांव येथील 55 वर्षीय महिला, टिळक मैदान खामगांव येथील 45 वर्षीय पुरूष, गारखेडा ता. सिं.राजा येथील 38 वर्षीय पुरूष, 17 वर्षीय तरूणी, 15 वर्षीय मुलगा, वर्दळी ता. सिं.राजा येथील 32 वर्षीय पुरूष, मेहकर येथील 15 वर्षीय दोन तरूणी, 9 वर्षीय मुलगा, दुर्गापुरा दे.राजा येथील 78 व 50 वर्षीय पुरूष, 13 व 48 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, डिएसडी मॉल बुलडाणा येथील 44 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 40 वर्षीय पुरूष, बुलडाणा येथील 51 वर्षीय पुरूष, नांदुरा येथील 9 वर्षीय मुलगा अशाप्रकारे जिल्ह्यात प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालामध्ये 28 रूग्ण पॉझीटीव्ह आढळले आहे.
त्याचप्रमाणे रॅपिड टेस्ट किटद्वारे प्राप्त पॉझीटीव्ह अहवालामध्ये शेगांव येथील 65 वर्षीय महिला, जमजम नगर शेगांव येथील 71 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय तरूण, 40 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला, 6 वर्षीय मुलगी, 36 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, आरोग्य कॉलनी शेगांव येथील 69 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय पुरूष, मेहकर येथील 64 वर्षीय पुरूष, चिखली येथील 55 वर्षीय महिला, डिएसडी मॉल बुलडाणा येथील 37 वर्षीय महिला, नांदुरा येथील 55 व 23 वर्षीय पुरूष संशयीत व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अशाप्रकारे रॅपिड टेस्टमधून 15 अहवाल पॉझीटीव्ह आहेत. तसेच आज ११ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here