नांदुराः प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस नांदुरा येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर विविध ठिकाणी वृक्षारोपण करून वृक्षाचे संवर्धन व संगोपन शपथ घेण्यात आली. याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे ता प्रमुख रामेश्वर काटे , शहर प्रमुख निलेश कंडारकर , नंदकिशोर महाजन,सागर कटक,दत्ता तायडे, अमोल मापारी, उद्धव काटे सर,सचिन अढाव , संजय हिंगणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती