नांदुरा : शहरात सुरू असलेल्या कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रभावामुळे दिवसेंदिवस लॉक डाऊन वाढतच आहे. मग यात गर्दीचे प्रमाण ही वाढतच आहे. अशात काही लोकांच्या तक्रारीनुसार आज मनसेचे शिष्टमंडळ सरळ भारतीय स्टेट बॅंक येथे सद्यस्थिती पाहण्याकरिता गेलं. तेंव्हा निदर्शनास आले की एकाच रांगेत पैसे काढण्यासाठी व पैसे टाकण्यासाठी भल्या मोठ्या प्रमाणात गर्दी होतं आहे. सोशल डीस तन्सिंग चे काहीच पालन होतं नाही आहे. काही लोकांना विचारले असता माहीत झाले की जन धन योजना व इतर चिल्लर विड्रॅल करायला एकच रांग लागलेली आहे. मग याचा जाब बँक मॅनेजर यांना विचारला असता मॅनेजर साहेबांनी सांगितले की दहा हजार रुपये पर्यंत पैसे काढणे व जमा करणे ही सुविधा ग्राहक सेवा केंद्र येथे मोफत उपलब्ध आहे. पण होतं असे आहे की पाचशे हजार रुपयांमागे सुध्धा चार्जेस आकारल्या जात होते. जो बँकेचा नियम नाही.ज्या ग्राहक सेवा केंद्रावर अतिरिक्त शुल्क आकारला जात होता तिथला स्टिंग ऑपरेशन करून तक्रार भारतीय स्टेट बँकेच्या मॅनेजर यांचेकडे करताच त्यांनी त्या ग्राहक सेवा केंद्रावर कार्यवाही करून त्यांचे परवाने रद्द करू अशी ग्वाही मनसेच्या शिष्टमंडळाला दिली व लगेच दोन ग्राहक सेवा केंद्र गायत्री मल्टी सर्व्हिसेस व प्रणाली मल्टी सर्व्हिसेस यानाला लगेच शटर खाली टाकून ग्राहक सेवा केंद्र बंद करण्याचे आदेश दिले.