Home Breaking News ठाणेदार सचिन चव्हाण यांनी उगारले कठोर कारवाई चे अस्त्र ; मास्क न...

ठाणेदार सचिन चव्हाण यांनी उगारले कठोर कारवाई चे अस्त्र ; मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

पिंपळगाव राजा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ठाणेदार सचिन चव्हाण व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी मोकाट फिरणाऱ्यां वर वचक ठेवण्यासाठी प्रयत्न चालविल्याचे दिसून येत आहे. परिणामी आज सकाळी ही मोहीम अधिक तीव्र करीन जवळजवळ 50 दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करण्याचे अस्त्र ठाणेदार चव्हाण यांनी उगारल्याने दुचाकीवर मोकाट फिरणाऱ्या वाहनधारकांची पंचाईत झाली आहे.
गावात व परिसरात काही नागरिक हे दुचाकी वर बसुन सोशल डिस्टन्सची पार वाट लावत असल्याने प्रशासनाच्या नियमांचा भंग करीत असल्याने ठाणेदार चव्हाण यांनी ठिकठिकाणी मोहीम राबऊन दुचाकी स्वारांवर कारवाई करीत आहेत.आज पिंपळगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ग्राम भालेगाव,ढोरपगाव,घाणेगाव, ज्ञानगंगापूर,जळका भडंग,तांदुळवाडी फाट्यासह आदी ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली असता दुचाकीस्वार व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

*मास्क न लावता व दुचाकीवरून प्रवास करतांना सोशल डिस्टन्स चे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.कोरोनाच्या पृष्ठभूमीवर खेडेगावातील व परिसरातील नागरिकांनी शासनाच्या अटी व नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून कोरोना महामारी ला रोखण्यास खूप मोठी मदत होईल.
सचिन चव्हाण ठाणेदार , पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here