Home Breaking News कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात ७ ते २१ जुलैपर्यत लॉकडाऊन

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात ७ ते २१ जुलैपर्यत लॉकडाऊन

बुलढाणा : माहिती देताना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा : जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रूग्णांचे प्रमाण वाढले आहे. संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दि. 7 जुलै ते 21 जुलै 2020 च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. या लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी नियमांचे पालन करीत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियेाजन समिती सभागृहात पालकमंत्री यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मलकापूरचे आमदार राजेश एकडे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ उपस्थित होते.
जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यात यापूर्वीच 15 जुलैपर्यंत प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश लागू केले असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या तालुक्यांमध्ये 15 जुलै नंतर 21 जुलै पर्यंत जिल्ह्याचे एकत्रित आदेश लागू होणार आहेत. मलकापूर उपविभाग वगळता या लॉकडाऊन कालावधीत सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उघडण्यास मुभा असणार आहे. तसेच त्याच दिवशी दुपारी 3 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत अत्यंत कडक कर्फ्यु लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा असणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊन कालावधीत प्रशासनाकडून पासेस वितरीत करण्यात येतील. जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही. जिल्ह्यात प्रशासनाने चांगले कार्य करीत, समन्वय ठेवीत कोरोनाला नियंत्रीत ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळविले आहे. ते पुढे म्हणाले, बुलडाणा येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. या लॅबचा अंदाजीत खर्च 1.50 कोटी रूपये आहे .तसेच डॉक्टरसह 10 मनुष्यबळ लॅबसाठी लागणार आहे. जिल्ह्यातील नमुने तपासणीसाठी अकोला, यवतमाळ व नागपूर येथे पाठविण्यात येत आहेत. पुढील काळात जालना येथे तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येत असून याठिकाणी जिल्ह्यातील नमुने तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नमुन्यांचे निदान लवकर होणार आहे. त्याचप्रमाणे जलद तपासणीसाठी 2000 रॅपिड ॲन्टीजेंट टेस्ट किट जिल्ह्याला मिळाल्या आहेत. या माध्यमातून 30 मिनीटात निदान होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here