Home कृषी ‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी

‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी

प्रशांत खत्री/ शेगाव

औरंगाबादेत कोरोनानं नुसतं थैमान घातलं आहे . कोरोना रोखायला जिल्हा प्रशासन पूर्णतः असफल ठरलं आहे.आपल्या अपयशाचं खापर जिल्हा प्रशासन आता माध्यमांवर फोडायला लागलं आहे . त्याचाच एक भाग म्हणून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून होत आहे . याचा शेगांव तालुका पत्रकार बांधवांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. दीव्य मराठीमध्ये ‘ 206 नागरिकांचे मारेकरी कोण ” ? ” नापासांची फौज : निर्णय घेण्यास कोण कुठे चुकले ” ? अशा मथळ्याखाली दोन बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या . बातम्या चुकीच्या असल्याचं कारण सांगत दीव्य मराठीचे संपादक , प्रकाशक आणि संबंधित वार्ताहराच्या विरोधात प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले आहेत. घडलेल्या घटनेचा शेगांव तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने या निवेदन द्वारे गुन्हे दाखल करणान्या प्रशासनाचा जाहीर निषेध करीत खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदन  देण्यासाठी शेगांव तालुका पत्रकार बांधवांच्या वतीने शेगांव प्रेस क्लब अध्यक्ष देवानंद उमाळे, प्रेस क्लब शेगांव अध्यक्ष राजेश चौधरी, अ.भा.ग्रा पत्रकार संघ तालुका शेगांव अध्यक्ष सचिन कडुकार, शेगांव शहर अध्यक्ष सिद्धार्थ गावंडे, शेगांव तालुका पत्रकार संघ अध्यक्ष दिनेश महाजन, अनिल उंबरकर, संजय सोनोने, गजानन कलोरे, फहीम देशमुख, अविनाश दळवी, दीपक सुरोसे, अरुण भटकर, धनराज ससाणे, श्रीकांत कलोरे, उमेश राजगुरे, मंगेश ढोले, महेंद्र मिश्रा, विजय मिश्रा, संजय त्रिवेदी, प्रशांत खत्री, दिनेश घाटोळ, आनंद जवंजाळ, राजकुमार व्यास, अमर बोरसे, श्याम देशमुख हे उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here