Home विदर्भ

पत्रकारांवर गुन्हे मागे घ्या

संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांनी निवेदन देऊन केला निषेध

सागर कापसे

  • संग्रामपूर : औरंगाबादेत कोरोनानं नुसतं थैमान घातलं आहे. कोरोना रोखायला जिल्हा प्रशासन पूर्णतः असफल ठरलं आहे.आपल्या अपयशाचं खापर जिल्हा प्रशासन आता माध्यमांवर फोडायला लागलं आहे . त्याचाच एक भाग म्हणून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून होत आहे . याचा संग्रामपुर तालुका पत्रकार बांधवांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. दीव्य मराठीमध्ये ‘ 206 नागरिकांचे मारेकरी कोण ” ? ” नापासांची फौज : निर्णय घेण्यास कोण कुठे चुकले ” ? अशा मथळ्याखाली दोन बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या . बातम्या चुकीच्या असल्याचं कारण सांगत दीव्य मराठीचे संपादक , प्रकाशक आणि संबंधित वार्ताहराच्या विरोधात पोलिसांनी खोते गुन्हे दाखल केले आहे. संपादक प्रकाशक व संबंधीत वार्ताहर वरिल गुन्हे मागे घ्या सदर बातम्यामुळे लोकसेवकांच्या मनावर परिणाम झाला असून महामारी विरुध्द चालू असलेल्या उपाययोजनांच्या काळात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप पोलिसांनी दीव्य मराठीवर ठेवला आहे वरील घडलेल्या घटनेचा संग्रामपूर तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने या निवेदन द्वारे गुन्हे दाखल करणान्या प्रशासनाचा जाहीर निषेध करीत खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावे. संबंधित विभागाने देशाचा चौथा आधारस्तंभ माध्यमांना न्यायाच्या दृष्टीने होण्यासाठी वरील घाटाने संदर्भात संबंधित संपादक प्रकाशक वार्ताहर यांच्या वरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल . आणि पुढील होणाऱ्या दुष्परिणामास संबंधित प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष केशवराव घाटे, काशिनाथ मानकर, मिर , मकसुद अली, पंजाब ठाकरे, अझहर अली, रामेश्वर गायकी, दयालसिंग चव्हाण, युसूफ शेख, सूचित धनभर, नारायण सावतकार, राजेंद्र ससाणे, अब्दुल हमीद शेख, श्याम देशमुख,गोपाल इंगळे, इरफनोद्दीन काझी, साबीर खान, यांनी तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांना देण्यात आले. निवेदनाच्या प्रति गृहराज्यमंत्री मुबंई, जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा, तहसीलदार संग्रामपूर यांना पाठवण्यात आल्या आहेत.