Home Breaking News संदीप थोरातने माफी मागावी ; अन्यथा विदर्भात फिरू देणार नाही ; संभाजी...

संदीप थोरातने माफी मागावी ; अन्यथा विदर्भात फिरू देणार नाही ; संभाजी ब्रिगेड अकोला विभागीय अध्यक्षांचा इशारा

 

अकोला:  अनेक पत्रकारांची फसवणूक करणाऱ्या तसेच ज्येष्ठ पत्रकारांबाबत बदनामीकारक पोस्ट व्हायरल करणाऱ्या अहमदनगर येथील ऑन धिस टाईम मीडियाचा मालक  संदीप थोरातने तात्काळ जाहीर माफी मागावी अन्यथा त्यास विदर्भात फिरू देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडचे अकोला विभागीय अध्यक्ष गणेश धामोळकर यांनी दिला आहे.

अहमदनगर येथील संदीप थोरात याने जानेवारी 2022 पासून विदर्भातील 11 जिल्ह्यात ऑन धिस टाईम मीडिया नावाने पोर्टलचे काम सुरू केले. विदर्भातील जनतेला भूलथापा देऊन चार हजाराच्या वर व्हाट्सअप च्या ग्रुपमध्ये स्वतःचा नंबर ऍड करून घेतला. या मीडिया करिता वर्तमानपत्रात जाहीरात मोठमोठ्या पगाराचे आमिष देऊन मार्केटिंग ऑफिसर ,जिल्हा प्रतिनिधी, बातमीदार अशा जागांची भरती सुरू असल्याचे जाहीर केले त्यांच्या भूलथापांना अनेक लोक बळी पडले मात्र त्यांना कामावरून रुजू करून घेतल्या नंतर प्रत्यक्षात ठरला तसा पगार देण्यात आलेला नाही अशा तक्रारी अनेक ठिकाणाहून प्राप्त झालेल्या आहेत
अहमदनगर येथे चौकशी केली असता संदीप थोरात यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून अपहरण लूटमार गंभीर गुन्हा त्याच्यावर दाखल आहेत तसेच त्याच्या सह्याद्री निधी बँकेच्या आर्थिक व्यवहाराबाबत बाबत कुजबूज सुरू आहे अहमदनगर मध्ये लोक आता उघड समोर येणार आहेत. त्यामुळे विदर्भातील नागरिकांनीही संदीप थोरात वर विश्वास ठेवू नये त्याच्या पासून सावधान रहावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या प्रकरणात लक्ष घालून संदीप थोरात च्या फसवेगिरी ला आळा घालावा अशी मागणी विविध पत्रकार संघटनांच्या वतीने केली जात आहे.

उल्लेखनीय आहे की, संदीप थोरात याने पुरस्कार सोहळ्याचे नावाखाली पैसे गोळा करण्याचा सपाटा सध्या विदर्भातील 11 जिल्ह्यात सुरू आहे. संदीप थोरात हा मिडियाचा मालक असून तो पत्रकार नाही. याधी अश्या प्रकारे त्याने अनेक पुरस्कार घेतले असून अनेक वेळा सोशल मीडियावर आरोप झालेले आहेत. त्यामुळे त्याने आधीचे न्युज लाईन नाव बदलून आता ऑन धिस टाईम केलेलं आहे. विशेष म्हणजे यावेळी पैसे गोळा करण्यासाठी मराठी सिने अभिनेता मकरंद अनासपुरे व त्यांच्या नाम संस्थाचा गैरवापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आलेली आहे. ही व इतर गंभीर प्रकरणे उघडकीस आल्यामुळे ,’उलटा चोर कोतवाल को डाटे’ या उक्तीप्रमाणे संदीप थोरात ज्येष्ठ प विदर्भातील पत्रकारांच्या बदनामीकारक पोस्ट टाकत आहे तरी संदीप थोरात यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा त्यांना विदर्भात फिरू देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडचे अकोला विभागाचे अश्या गणेश धामोळकर यांनी दिला आहे.