Home Breaking News अपहरण, लूटमारीचे गुन्हे दाखल असलेल्या संदीप थोरातपासून कुटुंबास धोका; पगार न देता...

अपहरण, लूटमारीचे गुन्हे दाखल असलेल्या संदीप थोरातपासून कुटुंबास धोका; पगार न देता धमकी: ओटीटी जाहीरात मॅनेजर सुरजित शर्मा यांची पोलिसात तक्रार

 

नागपुर : अपहरण, लूटमारीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ऑन धिस टाईमचा मालक संदीप थोरातपासून कुटुंबास धोका असून त्यांनी पगार न देता जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार ओटीटी जाहीरात मॅनेजर सुरजित राज शर्मा यांनी हुडकेश्वर पोलिसात केली आहे. अश्या अनेक तक्रारी विदर्भात ठीक ठिकाणी झाल्या असून अनेक पत्रकार बांधव तक्रारी करणार आहेत. त्यामुळे संदीप थोरातवर आता अटकेची टांगती तलवार असून विदर्भातील पत्रकार यांनी संदीप थोरातच्या ऑन धिस टाईम मीडिया पासून सावधान रहावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या प्रकरणात लक्ष घालून संदीप थोरात च्या फसवेगिरी ला आळा घालावा अशी मागणी विविध पत्रकार संघटनांच्या वतीने केली जात आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मा. पोलिस निरीक्षक ,पोलीस स्टेशन हुडकेश्वर नागपूर यांच्याकडे सुरजित राज, वय 40, रामभाऊ म्हाळगी नगर नागपुर यांनी लेखी तक्रार केली आहे . शर्मा हे ऑन धिस टाईम मीडियामध्ये जाहिरात मॅनेजर (मीडिया कर्मचारी ( ओटीटी) आहेत तर गैरअर्जदार – संदीप सुधाकर थोरात अधिक 3 ते 4 जण अहमदनगर हे आहेत. सुजित शर्मा यांनी तक्रार दिली आहे की मी ऑन धिस टाईम प्रा. लिमिटेड या कंपनीत 1 एप्रिल रोजी रूजू झालो. ही कंपनी सह्याद्री निधी बँकेच्या चेअरमन संदीप थोरात यांची आहे. कंपनीने माझ्या माध्यमातून विदर्भात विविध ठिकाणी प्रतिनिधी नेमले व त्यांना सुद्धा लेखी नियुक्तीपत्र देऊन तुम्हाला पगार देऊ असे सांगितले मात्र महिना संपल्यानंतर कुणालाही पगार देण्यात नाही टारगेट पूर्ण केले नाही असे खोटे सांगत प्रतिनिधींना पेमेंट दिले नाही तसेच मी पेमेंटची मागणी केली असता कंपनीचे चेअरमन संदीप थोरात व अन्य तीन ते चार जणांनी मला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तुझा पगार देत नाही जे होत असेल ते करून घे असे सुद्धा धमकावले.चोरी व महिलांच्या तक्रारी करून तुला खोट्या गुन्ह्यात अडकवतो असा सुद्धा धमकीवजा इशारा मला दिला गेला आहे. संदीप थोरात हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर मारहाण, अपहरण अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या गुन्हेगारी वृत्तीच्या संदीप थोरात व अन्य 3 ते 4 जनाकडून मी व माझ्या कुटुंबाला धोका असून त्यांच्यावर पत्रकार हल्ला विरोधी कायदा, शिवीगाळ धमकी देणे कर्मचाऱ्यांचे पगार न करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करावा व मी आणि माझ्या कुटुंबाला कायद्याचे संरक्षण द्यावे याकरिता मी लेखी अर्ज करत आहे. संदीप थोरात व त्याच्या सहकारी लोकांसोबत पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांनी वेळीच या प्रकरणात लक्ष घातले नाही तर विदर्भातील पत्रकार बांधवांच्या वतीने मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.