Home Breaking News पैसे घेवून पुरस्कार देणारी टोळी महाराष्ट्रात सक्रिय! मकरंद अनासपुरे, संदीप थोरातसह आयोजकांवर...

पैसे घेवून पुरस्कार देणारी टोळी महाराष्ट्रात सक्रिय! मकरंद अनासपुरे, संदीप थोरातसह आयोजकांवर गुन्हे दाखल करा- प्रा. सुधीर सुर्वे

 

नागपूर – पैसे घेवून पुरस्कार देणारी टोळी महाराष्ट्रात सक्रिय असून प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे असा गंभीर आरोप करत विदर्भ आयडॉल पुरस्काराच्या नावाखाली आर्थिक घोळ करणाऱ्या ऑन धिस टाईमच्या संदीप थोरातसह मकरंद अनासपुरे यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक प्रा. सुनील सुर्वे यांनी केली आहे याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मी गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेत सक्रीय आहे. मला नागपूर येथून ऑन धिस टाइम मीडियामधून 7 मे रोजी एका व्यक्तीचा फोन आला आणि तुम्हाला विदर्भ आयडल पुरस्कार द्यायचा आहे तुमची डिटेल्स माहिती द्या असे सांगण्यात आले व नंतर या पुरस्कार सोहळ्यासाठी तुम्हाला 20 ते 25 रुपये द्यावे लागतील अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी मी त्याना म्हटले की, मी सामाजिक कार्यकर्ता असून मला यापूर्वी मला अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत मात्र मी कोणताही पुरस्कार पैसे देऊन घेत नाही. पैसे देऊन पुरस्कार घेणे हा कायद्याने गुन्हा आहे असे असे त्यांनी सांगितले. मात्र त्यांनी पुरस्कार हवा असेल तर पैसे लागतील असे सांगितले. आपल्या देशाला व महाराष्ट्राला सांस्कृतिक असा वैभवशाली वारसा लाभलेला असून शासनातर्फे महाराष्ट्र भूषण , पदमश्री असे विविध पुरस्कार देऊन समाजसेवकांचा गौरव केला जातो मात्र आता बनावट पुरस्कार देऊन लाखोंचा गंडा करणारे रॅकेट सक्रिय आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात मराठी सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांचा सुद्धा समावेश असल्याचा धक्कादायक आरोप प्रा. सुधीर सुर्वे यांनी केला असून मकरंद अनासपुरे आयोजकांवर गुन्हे दाखल झाले नाही तर संपूर्ण विदर्भात तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

न्यूज लाईनचे नाव आता ओटीटी
संदीप थोरात यांच्या न्युज लाईन मीडियाचे नाव आधी न्यूज लाईन होते मात्र त्यांच्या पुरस्कार सोहळ्याचा घोटाळा उघडकिस आल्यावर त्यांनी पुरस्कार सोहळे घेण्यासाठी नव्याने ऑन धिस टाईम मीडिया नावाने सुरू केला असून या रॅकेटची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा प्राध्यापक सुधीर सुर्वे यांनी केले.

मकरंद अनासपुरे यांनी खुलासा करावा

मकरंद अनासपुरे हे आत्महत्याग्रस्त शेतकरी, अनाथ मुलं, वृद्ध, गोरगरिबांच्या विषयी आपुलकी दाखवतात परंतु खऱ्या अर्थाने जर पालले तर ते मोठ्या रॅकेटमध्ये समाविष्ट आहेत असे माझ्या निदर्शनास आले चला चे प्राध्यापक सुधीर सुर्वे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कारण यापूर्वीसुद्धा मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते बऱ्याच लोकांना पुरस्कार दिले परंतु हे सर्व पुरस्कार जवळपास पैसे घेऊन देण्यात आले मग जर हा पैसे घेऊन पुरस्कार देण्याचा धंदा जर मकरंदआनासपुरे करत असतील तर ही महाराष्ट्रासाठी शरमेची गोष्ट आहे. कला आणि चित्रपटसृष्टीला हा एक कलंक आहे कारण पैसे घेऊन पुरस्कार देणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे, हा व्यवसाय करण्यासाठी शासनाने यांना अशी जर परवानगी दिली असेल तर शासनाने सुद्धा खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.