Home Breaking News अहमदनगरचा भामटा संदिप थोरातची अशीही बदमाशी ! पत्रकारांचीच केली फसवणूक आता पडला...

अहमदनगरचा भामटा संदिप थोरातची अशीही बदमाशी ! पत्रकारांचीच केली फसवणूक आता पडला तोंडघशी!!

खामगाव-ओटीटी न्युज कंपनीचा प्रमुख तसेच सह्याद्री निधी कंपनीचा संचालक संदीप थोरात याचे आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून त्याने चक्क विदर्भातील पत्रकारांनाच चुना लावला अशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाले आहेत.

संदीप थोरात नामक नगरच्या भामट्याने विदर्भात नेमलेल्या प्रतिनिधींचे मानधन ,पगार डूबनण्याचे काळे कारनामे समोर आणले व त्या बद्दल कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या सर्व प्रतिनिधी वार्ताहर यांना सोबत घेऊन आवाज उचलल्यामुळे ज्येष्ठ पत्रकार श्रीधर ढगे यांच्यावर चीडुन बदनामीकारक बातमी ओटीटी न्यूज चा प्रमुख असलेल्या अहमदनगरचा भामटा संदीप थोरात याने बुलढाणा जिल्ह्यातील तसेच विदर्भातील विविध व्हाट्सअप ग्रुप वर वायरल केली त्यानंतर विदर्भात जोरदार विरोध होत असून विविध ठिकाणी व्हाट्सअप ग्रुप मधुन नंबर रिमुह करून निषेध व्यक्त केला जात आहे.

थोरातचे सर्व आरोप खोटे
संदीप थोरात याने केलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्याच्या कंपनीत विदर्भ प्रमुख असताना श्रीधर ढगे यांनी विदर्भात 11 जिल्हा बातमीदार 110 रिपोर्टर नेमले होते. जिल्हा बातमीदारांना वीस हजार रुपये, तालुका बातमीदारांना तीन हजार रुपये मानधन देऊ असा शब्द संदीप थोरात यांनी दिला होता मात्र जमा पगार द्यायची वेळ आली तेव्हा त्याचा खरा चेहरा समोर आला.
त्याने कोणालाही नियमानुसार पैसे दिले नाहीत उलट तुम्ही टारगेट पूर्ण केले नाही, मूल्यमापन करून तुमचे पगार देऊ असे म्हणत वेळ मारून नेली. त्यामुळे अनेक रिपोर्टर त्याचा मीडिया सोडून गेलेले आहेत तसेच त्याच्या विरोधात व्हाट्सअपवर पगार देत नाही अश्यापोस्ट टाकल्या जात आहे. त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा आम्हाला प्राप्त झालेले आहेत. विदर्भात मार्केटिंग ऑफिसर सुद्धा नेमण्यात आले होते ते सुद्धा सोडून गेले आहेत त्यांनाही मानधन मिळाले नाही अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. कुणाची बदनामी करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही मात्र समाजात व मिडियात भामट्या संदीप थोरात सारख्या प्रवृत्ती वाढीस लागू नये म्हणून संदीप थोरातचे कारनामे आम्ही समोर आणणार आहोत. या लढाईत आमच्यावर किती खोटे आरोप झाले, खोट्या तक्रारी झाल्या गुन्हे दाखल झाल्या तरी ही सत्याची लढाई आता थांबणार नाही ही स्वाभिमानी पत्रकार आणि दलाल मिडिया(ott) कंपनीचा प्रमुख गोरगरिबांचे रक्त शोषून धनाढ्य झालेल्या अहमदनगर च्या संधीसाधू उर्फ संदीप थोरात या भामट्या विरोधात जनशक्तीची लढाई सुरू झालेली आहे एवढे मात्र निश्चित…