Home Breaking News नगरच्या संदीप थोरातचा असाही पुरस्कार फंडा.. मकरंद अनासपुरेच्या नावावार विदर्भात लाखोचा गंडा.!

नगरच्या संदीप थोरातचा असाही पुरस्कार फंडा.. मकरंद अनासपुरेच्या नावावार विदर्भात लाखोचा गंडा.!

जिल्हा प्रतिनिधी

नागपूर – अहमदनगर येथील एका फायनान्स कंपनीने वेबसाईट काढून एक तोतया मीडिया स्थापन केला असून पुरस्कार सोहळ्याचे नावाखाली पैसे गोळा करण्याचा सपाटा सध्या विदर्भातील 11 जिल्ह्यात सुरू आहे. संदीप थोरात हा मिडियाचा मालक असून तो पत्रकार नाही. याधी अश्या प्रकारे त्याने अनेक पुरस्कार घेतले असून अनेक वेळा सोशल मीडियावर आरोप झालेले आहेत. त्यामुळे त्याने आधीचे न्युज लाईन नाव बदलून आता ऑन धिस टाईम केलेलं आहे. विशेष म्हणजे यावेळी पैसे गोळा करण्यासाठी मराठी सिने अभिनेता मकरंद अनासपुरे व त्यांच्या नाम संस्थाचा गैरवापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आलेली आहे.

हाच तो संदीप थोरात

नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात 15 जून रोजी ऑन धिस टाईम नावाच्या कथित मीडियाने विदर्भ आयडॉल या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यासाठी विदर्भातील समाजसेवकांना प्रस्ताव पाठवण्याची गळ घातली आहे. या करिता सोशल मीडियावर मकरंद अनासपुरे यांच्या फोटोसह बातम्या, जाहीरात प्रकाशित केल्या असून 100 लोकांना हा पुरस्कार दिला जाणार आहे असे त्यात नमुद आहे.

पैसे द्या, पुरस्कार घ्या!

प्रत्यक्ष माहिती घेतली असता हा पुरस्कार सोहळा नसून मोठा आर्थिक घोळ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा पुरस्कार हवा असेल तर चक्क 20 ते 25 हजार रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. याचा अर्थ मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या नावावर लाखो रुपये माया गोळा करण्याचे काम हा बनावट मीडिया व त्याचा तोतया संपादक संदीप थोरात करणार आहे

मोठ्या पगाराचे आमिष!

ऑन धिस टाईम मीडियाने नाशिक आणि नागपूर विभागासाठी भरतीची जाहीरात काढून 48 हजार, 40 हजार, 20 अश्या अश्या पगाराचे आकडे टाकले. प्रत्यक्ष मात्र कुणाचाही वेळेवर पगार दिला जात नाही आणि पूर्ण पगार मिळत नाही. विदर्भातील 11 जिल्हा बातमीदार व 110 वार्ताहर यांना मानधन दिल्या गेल्या नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अहमदनगर, नाशिक या त्यांच्या गावात संपादक मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे.