Home Breaking News पत्रकारितेच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल किशोर होगे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पत्रकारितेच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल किशोर होगे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

द रिपब्लिक अपडेट न्यूज नेटवर्क

खामगाव:- निस्पृह पत्रकारिता करत जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे सांजदैनिक प्रश्नकालचे मुख्य उपसंपादक किशोर होगे यांना बसली ग्रुप नागपूरच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

बालकलाकारांचा बसोली ग्रुप आपल्या कला अभिव्यक्तीच्या ४८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त येत्या १५ मे रोजी नागपूर येथे बसोलीचा वर्धपणदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बसोली ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना विशेष राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल खामगाव येथील सांजदैनिक प्रश्नकालचे मुख्य उपसंपादक किशोर गजानन होगे यांना बसोली ग्रुपचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १५ मे रोजी नागपुर येथे आयोजित सोहळ्यात पत्रकार होगे यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळाल्या बद्दल पत्रकार होगे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.