Home Breaking News ओबीसींच्या मुद्द्यावर आमदार कुटे यांचा सरकारवर असा हल्लाबोल

ओबीसींच्या मुद्द्यावर आमदार कुटे यांचा सरकारवर असा हल्लाबोल

राहुल निर्मळ, द रिपब्लिक न्यूज नेटवर्क

मुंबई:- ओबीसी च्या रद्द झालेल्या राजकीय आरक्षणाच्यादेवेंद्र फडणवीस पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे भारतीय जनता पार्टी च्या ओबीसी मोर्चा च्या वतीने मंथन करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की या महाविकास आघाडी सरकार ने राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची अक्षरशः कत्तल करून खून केला कारण माननीय कोर्टाने त्यांना 7 वेळा संधी देऊनही ते कोर्टात ओबीसी आरक्षणाची बाजू सक्षम रीत्या मांडू शकले नाही.

या बैठकीला प्रमुख उपस्थिती असलेले भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष तथा आमदार डॉ संजय कुटे यांनी सुद्धा महाविकास आघाडी सरकार वर जोरदार हल्ला चढवीत हा तर ओबीसींचा घात या शासनाने केला असल्याचे मत व्यक्त केले. सदर आरक्षणा करिता कोणताही आयोग तात्काळ गठीत करण्यात आला नाही, आल्यानंतर त्याला निधी दिला नाही, चुकीचा डेटा कोर्टात दिला,माहीत राज्य आयोगाच्या मार्फत सादर केली नाही अश्या राज्य सरकार च्या अनेक चकांमुळे त् कोर्टाने हा निर्णय दिला, यामुळे राज्य सरकार ची मंशा ही आरक्षण देण्याची नव्हती असेच सिद्ध होते असा घणाघात आ कुटे यांनी सरकार वर केला. एकीकडे कोर्टात वेळ काढून न्यायची आणि दुसरीकडे निवडणुकीची तयारी सुरू ठेवत सभांमधून कोणत्याही क्षणी निवडणुका लागतील असे सांगून कार्यकर्त्यां ना संदेश द्यायचं काम हे या सरकारमधील तीन पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने केले अश्यावेळी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरून ओबीसींची लढाई लढत होता पण आमचा कार्यकर्ता हा सक्षम असून कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी सदैव तयार असतो त्यामुळे सरकारने कितीही कुटील डाव टाकला तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी च जिंकेल असा ईशारा या महाविकास आघाडी सरकार ला दिला.