Home खामगाव विशेष उपनयन संस्करातून सुसंस्कृत पिढी निर्माण होते -माजी मंत्री शोभाताई फडणवीस

उपनयन संस्करातून सुसंस्कृत पिढी निर्माण होते -माजी मंत्री शोभाताई फडणवीस

खामगावात भव्य दिव्य सामूहिक उपनयन सोहळा संपन्न
खामगाव:  मानव जीवनातील सोळा संस्कारातील एक संस्कार हा उपनयन म्हणजे व्रतबध संस्कार असून या मौजीबंनधनाने भावी पिढीमध्ये संस्कार रुजविण्याचे कार्य होते ही परंपरा जोपासण्याचे कार्य महाराष्ट्र ब्राम्हण सभा खामगाव द्वारे राबविल्या जात आहे असे प्रतिपादन माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांनी केले आहे त्या खामगाव येथे आयोजित सामूहिक उपनयन सोहळ्या प्रसंगी प्रमुख अतिथी पदावरून बोलत होत्या 8 व्या वर्षा पासून मातापित्यांची सेवा व अध्यात्मिक अधिस्थानाचे बीज या संस्करातून रुजविल्या जाते असेही त्या या वेळी म्हणाल्या.

नामतपस्वी संत दिढे मामा या वेळी कार्यक्रमाचे प्रमुखस्थानी होते बटुनी मौजी बंधन स्वीकारल्या नंतर नाम जपाला महत्व द्यावे व माता पित्यांची सेवा करून अध्यात्माची कास धरावी असे या वेळी दिढे मामा यांनी या वेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले खामगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर ,माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा ,माजी नगराध्यक्ष सौ अल्कादेवी सानंदा ,जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, बुलढाणा जिल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे ,मुक्तेश्वर कुलकर्णी आदी मान्यवर या कार्यक्रमाला प्रमूख अतिथी म्हणून हजर होते या मान्यवरांचे सुद्धा या वेळी मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे प्रास्ताविक खामगाव ब्राह्मण सभा अद्यक्ष ऍड शेखर जोशी यांनी केले तर पाहुवण्यांचा परिचय पत्रकार गजानन कुलकर्णी यांनी करून दिला संचलन ब्राम्हन सभा खामगाव चे सचीव आशिष सराफ यांनी केले परशुराम भगवान यांचे पूजनांनाने या सोहळ्याची सुरवात झाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेता देवेन्द्र फडणवीस यांनी आशिष सराफ यांचे इ मेल वर पाठविलेला या आयोजना संदर्भातील शुभेच्छा संदेशाचे वाचन या वेळी करण्यात आले फडणवीस यांनी व्रतबध सोहळ्यात सहभागी सर्व बटुना या संदेशात शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले आहेत या सोहळ्यात 29 बटुचे व्रतबध पार पडले बटुचे आप्त पालक मोठया संख्येने या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी या सोहळ्याचा आनंद घेतला कार्यक्रमाचे पूर्व संध्ये ला बटुची शहरातून मिरवणूक काढण्यात आली यात बटू व त्यांच्या परिवाराने हिरीरीने सहभाग घेऊन सोहळा साजरा केला या कार्यक्रमात व उपनयन सोहळ्यात परिसरातील सर्व जाती धर्मीय नागरिक या वेळी उपस्तीत होते यातून जातीय सलोख्याचे दर्शन या सोहळ्यातून घडले .या सोहळ्याचे पौरोहित्य सर्वश्री पिंगळे गुरुजी,जहागीरदार गुरुजी व मुळे गुरुजी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्या करता महाराष्ट्र् ब्राम्हण सभेचे पदाधिकारी कार्यकर्तेसंजय कस्तुरे,प्रदीपजी राय, नितीन तिडोळे,सचिन पाठक, मोहन कुलकर्णी,ऋषिकेश कुलकर्णी,नितीन कुलकर्णी,सचिन संत,मनोज जोशी,प्रतीक जोशी,अनिकेत धरंगावकर,सुरेश घोडेराव,अनंतराव देशपांडे,श्री वल्लभ देशपांडे, विकास आंबेकर,मिलिंद सराफ,सचिन कुलकर्णी,चैतन्य जोशी,संदीप छापडगावकर,कुणाल खानझोडे, मयूर जोशी,वैभव शास्त्री,अमेय बर्डे, सौ शोभाताई कुलकर्णी,सौ अवधूतताई, सुरेश वाडीयांनी परिश्रम घेतले कार्यक्रमचे शेवटी आभार प्रदर्शन ऍड उदय आपटे यांनी करून या सोहळ्याची सांगता झालीयांनी परिश्रम घेतले कार्यक्रमचे शेवटी आभार प्रदर्शन ऍड उदय आपटे यांनी करून या सोहळ्याची सांगता झाली