Home Breaking News ‘या’जगप्रसिद्ध हनुमान मूर्तीसमोर चालीसा पठण

‘या’जगप्रसिद्ध हनुमान मूर्तीसमोर चालीसा पठण

द रिपब्लिक अपडेट न्यूज

नांदुरा :-
आज दिनांक 4/5/22/ रोजी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार नांदुरा शहर व तालुक्याच्या वतीने हनुमान चालीसा पठण व महाआरती कडक पोलिस बंदोबस्तात करण्यात आली यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असंख्य कार्यकर्ते व हिंदू प्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते या वेळी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष भागवत उगले यांनी स्पष्ट सांगितले असता आजची महा आरती ही मंदिरात करत आहेत जर हे अनधिकृत भोंगे उतरले नाही तर प्रत्येक अनधिकृत भोंग्या समोर रस्त्यावर येऊन हनुमान चालीसा पठण करण्यात येईल यावेळी उपस्थित महिला सेना अध्यक्ष ललिता ताई निखाडे, शहराध्यक्ष सागर जगदाळे, तालुक उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर, राजू काळे, शहर संघटक विशाल बबन,अजय बेलोकार, शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे, संतोष सोनवाल, गौरव टेंभुर्णी, सौरभ इंगळे, शुभम काटकर, विनायक सातव, सचिन उगले, रविराज बोंबटकार, राजेश इंगळे, गणेश जाधव, श्रवण फुटवाले, गणगे भाऊ आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते